25 October 2020

News Flash

छत्तीसगड : एक लाखाचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा

मदकम हिदमा असे नाव ; शस्त्रसाठा देखील जप्त

(संग्रहित छायाचित्र)

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात डीआरजीच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा झाला आहे. सुकमाचे एसपी शालभ सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, डीआरजीच्या जवानांबरोबर नक्षलींची आज चकमक झाली. यामध्ये एक लाखाचे बक्षीस असलेल्या मदकम हिदमा या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे.

नक्षलविरोधी मोहीमेचे उप महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी सांगितले की, रायपूरपासून जवळपास ५०० किलोमीटर अंतरावरील बिरभट्टी गावाजवळील जंगलात डीआरजीचे पथक शोध मोहीमेवर निघालेले असताना, या भागात दडलेल्या नक्षलींकडून जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आला. ज्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबारास सुरूवात झाली. जवानांनी केलेल्या गोळीबारानंतर नक्षलींनी जंगलात पळ काढला. गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळी एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला, शिवाय अन्य शस्त्र देखील जप्त करण्यात आले.

चकमकीत ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्याची ओळख माओवाद्यांच्या ग्रामीण पार्टीच्या समितीचा सचिव मदकम हिदमा अशी असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या नक्षलवाद्यावर एक लाखांचे बक्षीस होते. यानंतर जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू ठेवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 1:55 pm

Web Title: in an exchange of fire with drg team recovered a naxals body identified as madkam hidma msr 87
Next Stories
1 पाकिस्तानच्या मदतीमुळेच अमेरिका लादेनचा खात्मा करु शकलं, इम्रान खान यांचा दावा
2 महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना आरक्षण लागू करावे का?, नोंदवा तुमचे मत
3 बॉलच्या शोधात भिंत ओलांडणाऱ्या १७ वर्षीय मुलावर सुरक्षारक्षकाने झाडली गोळी
Just Now!
X