हिंदू कॅलेंडरप्रमाणे सध्या चातुर्मास सुरू असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातून एकदाच जेवण घेत आहेत. जवळपास महिन्याभरापासून मोदी दिवसातून एकदाच जेवण घेत आहेत.
मराठी महिन्यांप्रमाणे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. यंदा २७ जुलैपासून चातुर्मासाला सुरुवात झाली असून, २२ नोव्हेंबरपर्यंत चातुर्मास राहणार आहे. त्यामुळे या संपूर्ण काळात मोदी दिवसातून एकदाच जेवण घेणार आहेत. या महिन्याच्या अखेरिस मोदी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेसाठी अमेरिकाला जाणार आहेत. त्या काळातही ते दिवसातून एकदाच जेवण घेणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
चातुर्मासामध्ये अनेक लोक एखादे व्रत घेत असतात. काहीजण उपवास करतात तर काहीजण इतर अध्यात्मिक कार्य करतात. मोदी गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रामध्येही उपवास करतात.