News Flash

काँग्रेसच्या काळात १५ वेळा सर्जिकल स्ट्राइक, अशोक गेहलोत यांचा दावा

इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करत नवीन बांगलादेश बनवला. आपला जीव दिला पण खलिस्तान बून दिला नाही.

काँग्रेसच्या काळात १५ वेळा सर्जिकल स्ट्राइक, अशोक गेहलोत यांचा दावा
लष्कराच्या कामगिरीचे मोदी सरकार राजकारण करत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.

लष्कराच्या कामगिरीचे मोदी सरकार राजकारण करत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात १५ वेळा सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले. पण काँग्रेसने कधीच याचे राजकारण केला नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात २५ जागा मिळतील असा विश्वासही व्यक्त केला.

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या शासन काळात १५ वेळा सर्जिकल स्ट्राइक झाले. पण त्याचा राजकीय वापर कधी केला नाही. असा कायदाही नसतो..पण पंतप्रधान स्वत:चं धाडस असल्यासारखे दाखवत आहेत.

इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करत नवीन बांगलादेश बनवला. आपला जीव दिला पण खलिस्तान बून दिला नाही. पण मोदी हे गांधी कुटुंबीयांबद्दल वाईट बोलण्याशिवाय दुसरे काहीच करत नाहीत. दिलेली आश्वासनेही पूर्ण करण्यात मोदींना अपयश आले आहे. देशात मोदी आणि अमित शाह हे दोनच चेहरे राज्य करत आहेत. देशाचे हे दुर्भाग्य आहे. आज लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, देश संकटात आहे, असे त्यांनी म्हटले.

राजस्थानात काँग्रेसला २५ जागा मिळतील. जनतेचा विश्वास आमच्याबरोबर आहे. कुशासनाचा अंत निश्चित आहे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 1:56 pm

Web Title: in congress government period 15 surgical strike did but congress never use this for political reason says ashok gehlot narendra modi lok sabha 2019
Next Stories
1 तुम्ही चीनला मसूद अझहरविरोधात भूमिका घेण्यास का सांगितलं नाही ? भाजपाचा राहुल गांधींना सवाल
2 ‘त्या’ सर्व जवानांचे पार्थिव बाहेर काढण्यात यश; २३ दिवसांनंतर बचाव कार्य संपले
3 ‘नेहरुंमुळेच मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात अपयश’, भाजपाचे ट्विट
Just Now!
X