09 December 2019

News Flash

तुघलक काळातील ऐतिहासिक स्मारक बनले शिव मंदिर

मोहम्मद तुघलकच्या काळातील ऐतिहासिक वारसा असलेले स्मारक शिव मंदिर बनले आहे. दोन महिन्यांपूर्वी कोणाला काहीही कळू न देता या स्मारकाला शिव मंदिरामध्ये बदलण्यात आले.

राजधानी दिल्लीमध्ये मोहम्मद तुघलकच्या काळातील ऐतिहासिक वारसा असलेले स्मारक शिव मंदिर बनले आहे. दोन महिन्यांपूर्वी कोणाला काहीही कळू न देता या स्मारकाला शिव मंदिरामध्ये बदलण्यात आले. गुमती नावाचे हे स्मारक दिल्लीच्या सफदरजंग एन्क्लेव हुमायूपूर गावामध्ये आहे. हुमायूपूर गावात रहिवाशी इमारती आणि पार्कजवळ असलेल्या या वास्तूला राज्य सरकारने स्मारकाचा दर्जा दिला होता. मार्च महिन्यात या स्मारकाची सफेद आणि भगव्या रंगाने रंगरंगोटी करुन त्यामध्ये मुर्त्या ठेवण्यात आल्या.

पुरातत्व विभागाच्या सिटीजन चार्टर नियमांचे हे उल्लंघन आहे. सिटीजन चार्टरच्या नियमानुसार तुम्हाला ऐतिहासिक स्मारकामध्ये रंगकाम, दुरुस्तीला मनाई आहे. यासंबंधी दिल्ली सरकारच्या पुरातत्व विभागाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी यासंबंधी आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. मी या प्रकरणी संबंधित विभागाला चौकशी करायला सांगून त्यांच्याकडून अहवाल मागवून घेईन असे त्यांनी सांगितले.

इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज मागच्यावर्षी पुरातत्व विभागाच्या सहकार्याने या १५ व्या शतकातील स्मारकाचे दुरुस्ती काम करणार होते. पण स्थानिक नागरीकंच्या विरोधामुळे काम सुरु करता आले नाही. आयएनटीएसीएचचे प्रोजेक्ट संचालक अजय कुमार यांनी सांगितले कि, हे स्मारक बंद होते. स्थानिक नागरीकांच्या विरोधामुळे आम्हाला काम सुरु करता आले नाही. आम्ही पोलिसांकडेही गेलो होतो पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. आता इथे मंदिर बनले असून आपण स्मारक गमावून बसलो आहोत.

या स्मारकाजवळच बसण्यासाठी भगव्या रंगाचे दोन बेंच बसवण्यात आले आहेत. त्या बेंचवर सफदरगंज एन्क्वलेवच्या भाजपा नगरसेविका अबरोल फोगाट यांचे नाव आहे. यासंबंधी फोगाट यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले कि, या स्मारकाला मंदिरामध्ये कसे बदलण्यात आले त्याची मला कुठलीही माहिती नाही. या बदलाला माझे अजिबात समर्थन नव्हते. आधीच्या भाजपा नगरसेवकाच्या संमतीने हे सर्व करण्यात आले. मी त्यावर आक्षेप घेतला होता. पण हा संवेदनशील विषय आहे असे त्यांनी सांगितले.

First Published on May 4, 2018 9:20 am

Web Title: in delhi tomb turn into temple
टॅग Temple
Just Now!
X