News Flash

अहमदाबाद : दारुच्या नशेत पोलीस कर्मचारी गर्लफ्रेंडसह शिरला भलत्याच घरात, आणि मग…

पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

प्रातिनिधिक छायाचित्र

दारुची नशा माणसाला काय काय करायला भाग पाडते याचा खरंच अंदाज नसतो. गुजरातमधील अहमदाबाद शहरात एका पोलीस अधिकाऱ्याला याचा नुकताच अनुभव आला आहे. दारुच्या नशेत पोलीस कर्मचारी आपल्या गर्लफ्रेंडसह एका भलत्याच घरात शिरल्याचा प्रकार समोर आलाय. मंगळवारी ही घटना घडली असून घरातल्या व्यक्तींना स्टोअररुममधून आवाज यायला लागल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे.

उपेंद्रसिंह चावडा असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून मंगळवारी पहाटे ३ वाजल्याच्या दरम्यान आपल्या गर्लफ्रेंडसोबत थोडा वेळ घालवता यावा यासाठी दारुच्या नशेत उपेंद्र एका घरात शिरला. या घरात शिरल्यानंतर उपेंद्र आणि त्याच्या गर्लफ्रेंडने थेट स्टोअररुम गाठली. घरातील सदस्यांना अचानक स्टोअररुममधून आवाज यायला लागल्यानंतर तपासणीसाठी गेले असता त्याठिकाणी उपेंद्र दारुच्या नशेत आपल्या गर्लफ्रेंडसह आढळला. यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. साबरमती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत उपेंद्रसिंह चावडा या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या गर्लफ्रेंडला मात्र पोलिसांनी सोडून दिल्याचं समजतंय.

उपेंद्र शाहीबाग पोलिस वसाहतीत वास्तव्यास असून तो रानिप पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. याआधीही उपेंद्रवर आपल्या पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपेंद्रच्या पत्नीने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. पोलीस तपासादरम्यान, आपण गर्लफ्रेंडसोबत रात्री फिरत असताना आम्हाला एकत्र वेळ घालवण्यासाठी जागा हवी होती. साबरमती परिसरात एक घर दिसल्यामुळे तिकडे गेल्याचं उपेंद्रने सांगितलं. ज्या पोलिसांवर शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असते त्यांच्याकडूनच असा प्रकार घडल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 7:36 pm

Web Title: in dry gujarat heavily drunk policeman his girlfriend enter strangers house psd 91
Next Stories
1 Good News: बेरोजगारीचं प्रमाण २७.१ टक्क्यांवरून घटून ८.७५ टक्क्यांवर
2 चर्चेच्या नावाखाली दगा?; देपसांग, दौलत बेग ओल्डीमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत
3 “चीनविरोधी मोहिमेत सहभागी व्हा”; महिंद्रा, टाटा, अंबानी, बिर्लांसहीत ५० बड्या उद्योजकांना आवाहन
Just Now!
X