युद्ध करायचं नाही पण युद्धाची स्थिती निर्माण करायची आणि शेजारच्या देशाला दबावाखाली आणून भूभाग बळकावयाचा ही चीनची जुनी रणनिती आहे. आता पूर्व लडाखमध्येही चीनकडून हेच सुरु आहे. आर्थिक प्रगतीच्या बळावर कमावलेली लष्करी ताकत दाखवून चीन दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. पण चीन त्यात यशस्वी ठरणार नाही.

कारण भारत चीनशी दोन हात करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. १५ जूनला गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताने त्याची चुणूक दाखवून दिली आहे. सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असून आपल्याला चर्चेमध्ये रस आहे असे चीन दाखवतोय. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला नियंत्रण रेषेजवळ मोठया प्रमाणात सैन्याची जमवाजमव देखील सुरु आहे.