05 March 2021

News Flash

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार, CRPF जवान जखमी

सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

श्रीनगरच्या हद्दीबाहेर खोनमोह येथे सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. या चकमकीत केंद्रीय राखवी पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान जखमी झाला असून त्याला ९२ बेस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या जवानाची प्रकृती आता स्थिर आहे. खोनमोह भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी बालहामा येथील घराला घेराव घातला. चारही बाजूंनी आपण घेरले गेल्याचे लक्षात आल्यानंतर या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला.

प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात हे दोन्ही दहशतवादी ठार झाले. या दोघांच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या दोन्ही दहशतवाद्याकडे शस्त्रसाठा आणि दारुगोळाही सापडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 3:06 pm

Web Title: in encounter at jammu kashmir two terrorist killed by security forces
Next Stories
1 प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
2 देशाच्या सायबर सुरक्षा प्रमुखांना नेट बँकिंगपासून चार हात लांब राहणं पसंत
3 पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून द्या, सुसाइड नोटमध्ये नवऱ्याची शेवटची इच्छा
Just Now!
X