11 August 2020

News Flash

ट्रम्प यांचा मास्क लूक… पहिल्यांदाच मास्क घालून सार्वजनिक ठिकाणी दिसले

आधी मास्क वापरण्यास दिला होता नकार...

संग्रहित छायाचित्र

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कृतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चीननंतर जगात अमेरिकेत करोनाचा शिरकाव झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिगसह मास्क लावण्यासाठी सगळीकडे सांगितलं जात असताना ट्रम्प मात्र, प्रचार सभांसह सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावताच वावरत होते. त्यावरून त्यांना अनेकदा प्रश्नही विचारण्यात आले होते. मात्र, अखेर करोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीपोटी ट्रम्प यांनाही मास्क लावावा लागला.

करोनाच्या प्रसाराला जबाबदार ठरवत सातत्यानं चीनवर आगपाखड करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सार्वजनिक ठिकाणांसह प्रचार सभांनाही मास्क न लावताच जात असल्याचं आतापर्यंत दिसून येत होतं. त्यावरून त्यांना अनेकदा पत्रकार परिषदांमध्येही विचारण्यात आलं. मात्र, ट्रम्प विनामास्क वावरताना दिसत होते. पहिल्यांदाच ट्रम्प यांचा मास्क घातलेला लूक बघायला मिळाला. ट्रम्प यांनी वॉल्टर रीड राष्ट्रीय लष्करी वैद्यकीय केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी जखमी जवानांची व आरोग्य कर्मचाऱ्यांची भेट घेतली. या भेटीवेळी ट्रम्प यांनी तोंडावर मास्क लावलेला होता.

वॉल्टर रीड राष्ट्रीय लष्करी वैद्यकीय केंद्राला भेट देताना डोनाल्ड ट्रम्प. (फोटो सौजन्य :AP)

यापूर्वी ट्रम्प यांनी सार्वजनिक जीवनात वारताना मास्क घालण्यास सातत्यानं नकार दिला होता. त्याचबरोबर अमेरिकन लोकांनाही त्यांनी तसं आवाहन केलं होतं. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं होतं. मात्र, या भेटीपूर्वी ट्रम्प यांनी वेगळी प्रतिक्रिया नोंदवली. “मला असं वाटतं की ज्यावेळी आपण रुग्णालयात असता, विशेषतः एका विशिष्ट परिस्थितीत जेव्हा तुम्ही अनेक सैनिकांशी बोलता. काही लोक बरे झालेले आहेत, अशा वेळी मला वाटत की मास्क घालणं ही चांगली गोष्ट आहे,” असं ट्रम्प हे व्हाईट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 11:25 am

Web Title: in first trump dons masks in visit to a military medical facility bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनाचा धोका वाढला; २४ तासांत २८,६३७ नवे रुग्ण तर ५५१जणांचा मृत्यू
2 मुकेश अंबानींनी वॉरेन बफेट यांना टाकलं मागं; जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी
3 मोदी तुम्हाला गुरु मानतात.. यावर शरद पवार हसले आणि म्हणाले…
Just Now!
X