News Flash

काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; दोन भारतीय जवान शहीद

कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये भारतीय सैनिकांवर केला हल्ला

काश्मीरमधील कुपवाडा येथिल सीमाभागात आज पुन्हा दहशतवादी हल्ला झाला. येथील केरन सेक्टरमध्ये अचानक झालेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. दोन तासांपूर्वी हा हल्ला झाल्याचे सुत्रांकडून कळते. दोन दिवसांपूर्वीच येथिल अमरनाथ यत्रेकरूंच्या एका बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यात ७ भाविक ठार झाले होते.

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये हाय अॅलर्ट जारी करण्यात आला होता. लष्कर-ए-तोयबाने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारल्यानंतर या भागात भारतीय लष्कराची मोठ्या प्रमाणावर शोध मोहिम सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 4:46 pm

Web Title: in fresh kashmir attack by pakistan two indian soldiers dead
Next Stories
1 Video: चालकाशिवाय मालगाडी सुसाट धावली अन्…
2 जीएसटीचा निषेध : मुंबईतील कापड व्यापारी संपावर जाण्याची शक्यता
3 मोदींच्या रुपात समाजाला नवा ठेकेदार मिळाला: मोहन भागवत
Just Now!
X