News Flash

शाळेच्या स्वच्छतागृहात सापडला नववीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह, शरीरावर जखमा

गुजरात वडोदरा येथील शाळेच्या स्वच्छतागृहात शुक्रवारी सकाळी एक विद्यार्थी मृतावस्थेत सापडला. या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे

गुजरात वडोदरा येथील शाळेच्या स्वच्छतागृहात शुक्रवारी सकाळी एक विद्यार्थी मृतावस्थेत सापडला. या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. नवव्या इयत्तेत शिकणारा हा विद्यार्थी १४ वर्षांचा असून त्याच्या शरीरावर चाकूने भोसकल्याच्या खूणा आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

या घटनेने मागच्यावर्षी देशभरात गाजलेल्या प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. दिल्ली गुरगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या प्रद्युम्नचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात आढळला होता. गळा कापून प्रद्युम्नची हत्या करण्यात आली होती.

या हत्येने पालकवर्गाला जबर धक्का बसला होता तसेच देशभरात संतापाची लाट उसळली होती. शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी असल्याचे त्यावेळी तपासातून समोर आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2018 3:04 pm

Web Title: in gujarat vadodara student body found in school washroom
टॅग : Death,Gujarat
Next Stories
1 २४ वर्षांच्या मुलाने कुऱ्हाडीचे घाव घालून केली आई वडिलांची हत्या
2 “पाकिस्तान दोन आहेत, एक भारताबाहेर, एक काँग्रेसमध्ये”
3 ‘जिवंत असेपर्यंत सोडणार नाही’, भाजपा आमदाराच्या घरी एक्स गर्लफ्रेंडचा राडा
Just Now!
X