News Flash

भारतातही होते केंब्रिज अॅनालिटिकाचे कार्यालय; व्हिसलब्लोअरने काँग्रेसचेही घेतले नाव

भाजपाला या प्रकरणाची भिती वाटत असल्याचा दावा

व्हिसलब्लोअर क्रिस्तोफर वाइली

केंब्रिज अॅनालिटिका कंपनीतील डेटा लीक झाल्याप्रकरणी भारतात सध्या मोठा गोंधळ पहायला मिळतो आहे. या प्रकरणावरुन सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, डेटा लीक झाल्याचे सांगणारा व्हिसल ब्लोअर क्रिस्तोफर वाइलीने मंगळवारी दावा केला की, बहुतेक अॅनेलिटिकाचा ग्राहक काँग्रेसही होती. या खुलाशानंतर भाजपाने काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने खोटं बोलल्याबद्दल देशाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

वाइलीच्या म्हणण्यानुसार, कंपनी भारतात मोठ्या प्रमाणावर काम करीत होती याचा क्लायंट काँग्रेस पक्षही असेल असे त्यांनी म्हटले आहे. कंपनी भारतात मोठ्या प्रमाणावर काम करीत होती. याचा क्लायंट काँग्रेस पक्षही आहे. भारतात या कंपनीचे एक कार्यालयही होते. २८ वर्षीय वाइली यांनी ब्रिटिश संसदेत सांगितले की, मी मानतो की काँग्रेस कंपनीचा क्लायंट असेल मात्र, ते सर्व प्रकारच्या प्रकल्पांसाठी या कंपनीचे सहाय्य घेत होते. मला सध्या कोणता राष्ट्रीय प्रकल्प लक्षात नाही. भारत इतका मोठा आहे की, त्यातील एकएक राज्य हे ब्रिटनपेक्षाही मोठे आहे.

यावर प्रतिक्रिया देताना रविशंकर प्रसाद म्हणाले, राहुल गांधी आता उघडे पडले आहेत. काँग्रेसने केंब्रीज अॅनॅलिटिकाची सेवा वापरल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेसला देशातील जनतेवर विश्वास नाही. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितले की, रविशंकर प्रसाद खोट बोलत आहेत. त्यांनी म्हटले की, रविशंकर प्रसाद कोणत्याही टिव्ही चॅनेलवर फक्त टीका करुन जातात. त्यांचे सरकार आहे तर त्यांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करावेत. त्यांच्या जवळ पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावेत. मात्र, ते तसं करीत नाहीत त्यांना भिती आहे की, याची चौकशी झाल्यावर त्यांचा चेहरा उघडा पडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 5:00 am

Web Title: in india also the office of cambridge analys whistleblower named congress
Next Stories
1 जम्मू-काश्मीरसंबंधी ३७० कलम रद्द करण्याचा विचार नाही- अहिर
2 कर्नाटकचा निकाल देशाच्या राजकारणाला कलाटणी देणार
3 आरोग्य सुरक्षा कायद्याचा मसुदा सरकारच्या संकेतस्थळावर जाहीर
Just Now!
X