News Flash

‘भारतीय मेहनत करतात, मर्सिडिझ घेतात पण नवनिर्मितीचे काय?’

न्यूझीलंडसारख्या छोट्या देशातही गायक, खेळाडू, लेखक असे वेगळेच विश्व बघायला मिळेल

‘भारतीय मेहनत करतात, मर्सिडिझ घेतात पण नवनिर्मितीचे काय?’
अॅपलचे सहसंस्थापक आणि द वोझ या टोपणनावाने ओळखले जाणारे स्टीव्ह वोजनियाक हे नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते.

भारतीय खूप अभ्यास करतात, मेहनत करतात, एमबीए होऊन मर्सिडिझ घेतात, पण सर्जनशीलतेचे काय, असा सवास उपस्थित करत अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह वोजनियाक यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवले आहे. सोशल मीडियावरही वोजनियाक यांच्या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

अॅपलचे सहसंस्थापक आणि द वोझ या टोपणनावाने ओळखले जाणारे स्टीव्ह वोजनियाक हे नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. दिल्लीत वोजनियाक यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतातील तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल परखड मात मांडले. ते म्हणाले, भारतीय संस्कृती ही तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित आहे. भारतात अभ्यास करा, शिक्षण घ्या, चांगली नोकरी मिळवा हेच यशस्वी आयुष्याचे सूत्र आहे, असे त्यांनी सांगितले.

जागतिक स्तरावरील दिग्गज टेक कंपनी भारतातून घडू शकते का असा प्रश्न विचारले असता ते म्हणतात, मी काही शास्त्रज्ञ नाही. मला भारतीय संस्कृतीची फारशी माहिती नाही. पण मला इथे मोठ्या कंपनीसाठी आवश्यक असलेली संधी दिसत नाही. जेव्हा तुम्ही शिक्षण, नोकरी व पैसा असा साचेबद्ध विचार करता त्यावेळी तुम्ही सगळा समाज एकसारखा होऊन जातो आणि सर्जनशीलता नावाला देखील दिसत नाही. याऊलट न्यूझीलंडसारख्या छोट्या देशातही गायक, खेळाडू, लेखक असे वेगळेच विश्व बघायला मिळेल, असे त्यांनी सांगितले.

तुम्ही अजूनही संशोधन करता का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, मला वेळेअभावी संशोधनाकडे लक्ष देता येत नाही. मात्र माझ्या प्रत्येक प्रॉजेक्टला ए प्लस गूण मिळायचे. माझ्या डोक्यात नेहमीच तो विचार असायचा. मी मध्यरात्री झोपेतून उठूनही प्रॉजेक्टवर काम केले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.

अॅपलमधून बाहेर पडण्याचा निर्णय चुकला असे वाटते का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी कधीच नाही असे उत्तर दिले. तु पुढे म्हणाले, मी अजूनही अॅपलमध्येच आहे. मला अजूनही तिथून पगार मिळतो. तो कमी असेल, पण मी त्यात समाधानी आहे. स्टीव्ह वोजनायक यांना सध्या प्रत्येक आठवड्याला अॅपलकडून १०० डॉलर मिळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2018 2:09 pm

Web Title: in india success based upon study good job have mercedes wheres creativity asks apple cofounder steve wozniak
Next Stories
1 कर्नाटकात पहिलीपासून कन्नड सक्तिची झाली, महाराष्ट्रात मायमराठी होणार का?
2 श्रीदेवींच्या मृत्यूचे कारण कळताच श्रद्धांजलीच्या यादीतून वगळले नाव
3 अरूण जेटलींच्या जागी मी असतो तर राजीनामा दिला असता: पी. चिदंबरम
Just Now!
X