08 December 2019

News Flash

Article 370: “तुम्हाला जे ७० वर्षांमध्ये जमलं नाही ते आम्ही ७० दिवसात करुन दाखवलं”

"केंद्र सरकारने कलम ३७० संदर्भात पुढाकार घेत निर्णय घेतला"

पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यातही कलम ३७० संदर्भात त्यांनी विरोधी पक्षांवर टीका करत तुम्हाला जे ७० वर्षांमध्ये जमलं नाही ते आम्ही ७० दिवसात करुन दाखवलं असा टोलाही लगावला. सत्तेत आल्यानंतर अवघ्या १० आठवड्यांमध्ये आम्ही कलम ३७० हटवलं, तिहेरी तलाक रद्द केला असंही मोदींनी या भाषणामध्ये सांगितलं.

कलम ३७० संदर्भात बोलताना मोदींनी नाव न घेता काँग्रेसवर आणि विरोधी पक्षांवर टिका केली. “नवीन सरकार सत्तेमध्ये येऊन १० आठवडेही झालेले नाहीत तरी या कालावधीमध्ये कलम ३७० हटवलं, तिहेरी तलाक रद्द करण्यासारखे महत्वाचे निर्णय आम्ही घेतले. कलम ३७० हटवण्याचं काम ७० वर्षांमध्ये झालं नाही ते आम्ही नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर ७० दिवसांच्या आत करुन दाखवलं. कलम ३७० संदर्भात निर्णय घ्यावा असं सर्वांनाच वाटत होतं पण कुणी ते करावं हा प्रश्न होता. अखेर केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेत निर्णय घेतला. लोकांनी दिलेलं काम करण्यासाठी आम्ही सत्तेत आलोय,” असं मोदी म्हणाले. तसंच कलम ३७० आणि ३५ ए हटवण्यासाठी बहुतेक सगळ्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलं.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्यांदात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण दिले. ऐतिहासिक विजयानंतर आणि लोकसभेच्या ऐतिहासिक अधिवेशनानंतर पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. लाल किल्ल्यावर झेंडावंदन करण्यापूर्वी मोदींनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींच्या समाधीला आदरांजली अर्पण केली.

मोदींनी आपल्या भाषणामध्ये भ्रष्टाचार, गरीबी, पूरपरिस्थितीपासून सरकारी योजनांपर्यंत अनेक विषयांना मोदींने हात घातला. त्याचबरोबर त्यांनी नाव न घेता काँग्रेसवर अनेक मुद्द्यांवरुन टिका केली.

First Published on August 15, 2019 9:09 am

Web Title: in less than 70 days of the new government article 370 has become history modi scsg 91
Just Now!
X