Updates Fani Cyclone: सर्वाधिक घातक असे भाकित वर्तविण्यात आलेले ‘फॅनी’ चक्रीवादळ ओदिशातील पुरीच्या किनारपट्टीला धडकले आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. दरम्यान या वादळामुळे तिघांचा बळी गेला आहे असे समजते आहे. ओदिशाच्या गोपालपूर, पुरी, चांदबाली, बालासोर आणि अन्य भागांमध्ये सोसायटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
ओदिशाला धडकलेल्या शक्तीशाली फॅनी चक्रीवादाळामुळे वीज पुरवठयावर परिणाम झाला आहे. अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. रस्ते ओस पडले आहेत. राज्याची राजधानी भुवनेश्वरसह कटक आणि भद्रक या शहरांमध्ये सोसाटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या २० वर्षातील भारतात धडकलेले हे सर्वात भीषण चक्रीवादळ आहे.
फॅनी चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर एकंदरित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हवाई पहाणी करण्यात आली
https://platform.twitter.com/widgets.js
फॅनी या चक्रीवादळाचा कहर सुरूच आहे. या वादळाचा फटका चिरंजीवी यांच्या फार्महाऊसलाही बसला आहे
https://platform.twitter.com/widgets.js
फॅनी चक्रीवादळ शुक्रवारी सकाळी ओदिशातील किनारपट्टीवर धडकले असून वादळाचा प्रभाव असलेल्या भागात २०० किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहत आहेत. या वादळात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ओदिशातील अधिकाऱ्यांनी दिली.
फॅनी चक्रीवादळामुळे भुवनेश्वरमध्ये वृक्ष उन्मळून पडले आहेत.
https://platform.twitter.com/widgets.js
ओदिशामध्ये भुवनेश्वरसह काही ठिकाणी वादळामुळे झाडे उन्मळून पडली असून छोटया टपऱ्याही उखडल्या गेल्या आहेत.
फॅनी चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढच्या दोन दिवसाच्या प्रचारसभा रद्द केल्या. परिस्थितीचा घेणार आढावा.
पुरी किनारपट्टीवर धडकले फॅनी चक्रीवादळ, भुवनेश्वरमध्ये वादळी वारे, वाऱ्यांचा वेग १७५ किमी प्रतितास
फॅनी चक्रीवादळ पुढच्या पाच ते सहा तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी २०० ते २३० किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
श्रीकाकुलम येथील कोट्टूरु मंडल येथे एनडीआरएफकडून मदत कार्य सुरु आहे.
https://platform.twitter.com/widgets.js
भारतीय तटरक्षक दलाने आपत्ती व्यवस्थापनाच्या ३४ टीम्स सज्ज ठेवल्या आहेत.
https://platform.twitter.com/widgets.js
ओदिशाच्या पुरीमध्ये ताशी १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून वाऱ्याचा हा वेग १८० ते २०० किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
विशाखापट्टणममध्ये सोसायटयाचा वारा
https://platform.twitter.com/widgets.js
एनडीआरएफचे जवान पारादीप बीचवर स्थानिकांना परिसर रिकामी करण्याचे आवाहन करत आहेत.
https://platform.twitter.com/widgets.js
‘फॅनी’ प्रभावित राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ८१ तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.
१० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
https://platform.twitter.com/widgets.js