25 November 2020

News Flash

मोदींच्या दौऱ्याआधी सीमेवर पाकिस्तानकडून तुफान गोळीबार, BSF जवान जखमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा ( BSF) एक जवान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गुरुवारी तुफान गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा ( BSF) एक जवान जखमी झाला आहे.

पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर सांबा आणि हिरानगर सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आला अशी माहिती बीएसएफच्या सूत्रांनी दिली. रेंजर्सनी बीएसएफच्या डझनभर चौक्यांवर रात्रभर गोळीबार केला. रीगल पोस्टवर तैनात असलेला एक जवान या गोळीबारात जखमी झाला. बीएसएफने पाकिस्तानच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले.

मंगळवारी सांबामध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा एक कॉन्स्टेबल शहीद झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ ला जम्मू-काश्मीर दौऱ्यावर येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 1:43 pm

Web Title: in pakistan firing at international border jawan injured
टॅग Indian Army
Next Stories
1 ड्रायव्हिंग करताना मोबाइलवर बोलणे बेकायदेशीर नाही – केरळ उच्च न्यायालय
2 फक्त काहीशे मतांनी भाजपाने गमावल्या ‘या’ १२ जागा
3 ७१ वर्षांत ‘या’ २२ मुख्यमंत्र्यांनी केलं कर्नाटकवर राज्य
Just Now!
X