25 May 2020

News Flash

राजस्थानात लवकरच ऑनर किलिंग, झुंडबळी प्रतिबंधक कायदे

ऑनर किलिंग प्रतिबंधक कायद्यात दोषींना फाशीची शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे.

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

राजस्थानमधील झुंडबळी (मॉब लिचिंग) आणि ऑनर किलिंगच्या (प्रतिष्ठाबळी) घटनांना आळा घालण्यासाठी अशोक गेहलोत यांचे सरकार कायदा लवकरच कायदे करणार आहे. या दोन्ही कायद्याचे प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आले आहेत. हे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी आवश्यक न्यायालय तयार करण्याची योजनाही विधेयकात प्रस्तावित आहे.

झुंडीपासून संरक्षण कायदा-२०१९ आणि सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रथांच्या नावाखाली वैवाहिक स्वातंत्र्यामधील हस्तक्षेप प्रतिबंधक कायदा-२०१९ अशी दोन्ही विधेयके सरकारच्या वतीने विधानसभेत मांडण्यात आली आहेत. गेल्या काही काळात झुंडबळीच्या असंख्य घटना घडल्या आहेत. यात अनेकांना जिव गमवावा लागला, तर काही जखमी झाले आहेत. द्वेषाचे वातावरण कमी करून अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी हा कायदा सरकारने आणला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सागितले.

यासाठी राज्य पातळीपासून जिल्हास्तरापर्यंत समन्वयक असणार आहे. राज्यस्तरावरील अधिकाऱ्याचे पद पोलीस महानिरीक्षकांच्या दर्जाचे असून त्याची नियुक्ती राज्याचे पोलीस महासंचालक करणार आहे. याचप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक अधिकारी समन्वयक असणार आहे. या कायद्यात झुंडबळीची व्याख्या सविस्तर करण्यात आलेली आहे. राजस्थान सरकारने ऑनर किलिंग प्रतिबंधक कायद्यात दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतुद केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2019 5:17 pm

Web Title: in rajasthan law for protection from mob lynching honour killing bmh 90
टॅग Rajasthan
Next Stories
1 “आधी Su-57 तुम्ही वापरा मग खरेदीचं बघू,” एअर फोर्स प्रमुखांचे रशियामध्ये उत्तर
2 कुलभूषण जाधव यांना उद्या मिळणार भारतीय दुतावासाची मदत
3 अयोध्या मध्यस्थ समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर
Just Now!
X