News Flash

चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याला तरुणीने भोसकलं; २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

तो कपडे काढू लागला तेव्हा या तरुणीने त्याच्याकडे विनंती करत मला जाऊ दे असं सांगितलं, मात्र...

प्रातिनिधिक

तामिळनाडूमधील तिरुवेल्लूर जिल्ह्यामध्ये एका तरुणीने स्वसंरक्षणार्थ तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाची हत्या केली. चाकूचा धाक दाखवून या १९ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला तरुणाचा या सर्व झटापटीमध्ये मृत्यू झाला. तरुणीने स्वत:चा बचाव करण्यासाठी या तरुणाने दाखवलेला चाकूनेच त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. टाइम्स न्यूज नेटवर्कच्या वृत्तानुसार पोन्नारीच्या पोलिस उपअधीक्षक कल्पना दत्त यांनी या प्रकरणामध्ये पोलीस खात्याने कायदेशीर सल्ला मागवला असून या १९ वर्षीय तरुणीला अटक केली जाण्याची शक्यता खूपच कमी असल्याचेही म्हटले आहे.

नक्की वाचा >> खाज नडली… चेहरा खाजवण्यासाठी चोराने काही क्षणांसाठी मास्क काढलं अन्…

शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही तरुणी लोवस्तीपासून काही अंतरावर असणाऱ्या झाडाझुडपांमध्ये शौचासाठी गेली असता हा प्रकार घडला. याच गावात राहणारा एस. अजितकुमार हा याच मुलीच्या नात्यातील तरुण तिचा पाठलाग करत होता. अचानक या मुलाला बियरची बाटली हातात घेतलेल्या अवतारात स्वत:समोर उभं राहिलेलं पाहून ही मुलगी घाबरली. ही मुलगी पुढे काही करण्याआधीच या तरुणाने तिच्या गळ्यावर चाकू ठेऊन तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिल्याचे या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये सांगितलं आहे. हा तरुण स्वत:चे कपडे काढू लागला तेव्हा या मुलगी त्याच्याकडे गयावया करु लागली. मला जाऊ दे, मी कोणालाही काहीही सांगणार नाही अशी विनंती ती करत होती. मात्र त्याच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. अखेर हा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने त्याला जोरात धक्का दिला. हा तरुण जवळच्या झाडावर आदळला तेव्हा त्याच्या हातातील चाकू खाली पडला.

नक्की वाचा >> नवी मुंबई : उघड्यावर लघुशंका करण्यावरुन झालेल्या वादातून एकाची हत्या

पडलेला चाकू उचलून या तरुणीने एस. अजितकुमारच्या गळ्यावर अनेकदा वार केले. या हल्ल्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. रात्री नऊच्या सुमारास ही तरुणी स्वत:च स्थानिक पोलीस स्थानकात पोहचली आणि तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी धाव घेतली असता तिथे या तरुणाचा मृतदेह त्यांना आढळून आला. शवविच्छेदनासाठी हा मृतदेह स्टेनली रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असला तरी कोणाल अटक करण्यात आलेली नाही.

उपअधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी दहाव्या इयत्तेच्या परिक्षेची तयारी करत आहे. आरोपी अजितकुमारला दोन मुलं असून तो या तरुणीच्या मावशीचा मुलगा होता. घरगुती वादामुळे काही महिन्यांपूर्वीच अजितकुमार त्याच्या पत्नीपासून वेगळा झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजितकुमार हा बेरोजगार आणि दारुचा व्यसन असलेल्यांपैकी होता. यापूर्वीही त्याच्याविरोधात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले. तो नेहमी स्वत: जवळ चाकू ठेवायचा, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. “सध्या तरी घडलेला सर्व प्रकार हा स्वसंरक्षणासाठी घडल्याचे दिसून येत आहे. याशिवाय या प्रकरणामध्ये दुसरा कोणताही हेतू दिसून येत नाही,” असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणात त्यांचा अहवाल न्यायालयासमोर सादर करणार असून त्यानंतरच पुढे काय करायचं हे ठरवलं जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 7:53 am

Web Title: in self defence tamil nadu teen stabs rapist to death with his own knife scsg 91
Next Stories
1 ब्रिटनमध्ये संपूर्ण लॉकडाउनची घोषणा
2 शेतकऱ्यांवरील अत्याचारांच्या चौकशीसाठी पंजाबच्या विद्यार्थ्यांचे सर्वोच्च न्यायालयाला पत्र
3 कंपन्यांमध्ये लस‘कारण’
Just Now!
X