News Flash

दुपारच्या सत्रातील भूकंपानंतर शेअर बाजार सावरला, २७९ अंकांची पडझड

मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी नाटयमय घडामोडी पाहायला मिळाल्या. दुपारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १,१०० अंकांनी घसरला होता.

सेन्सेक्स

मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी नाटयमय घडामोडी पाहायला मिळाल्या. दुपारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १,१०० अंकांनी घसरला होता तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ३६७ अंकांची घसरण झाली होती. पण दिवसअखेरीस शेअर बाजार बऱ्यापैकी सावरला. बीएसई सेन्सेक्स ३६,८४१ अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ११,१४३ अंकांवर बंद झाला. एकूण दिवसभरात २७९ अंकांची पडझड झाली. बँकिग क्षेत्रातील शेअर्सना या पडझडीचा सर्वाधिक फटका बसला.  येस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.

दुपारच्या सत्रात सेन्सेक्स १,१०० पेक्षा जास्त अंकांनी घसरुन ३५,९९३ अंकांवर पोहोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ११ हजारच्या खाली येऊन १०,८६६ अंकांवर पोहोचला होता. बँकिंग, आयटी आणि फार्मा सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण झाली होती.

सुरुवातीच्या घसरणीनंतर दुपारी दीडच्या सुमारास शेअर बाजार काही प्रमाणात सावरला. महत्वाचं म्हणजे शुक्रवारी सकाळच्या सत्रात चांगली सुरुवात झाली होती. शेअर बाजार ३०० अंकांनी वधारला होता तरीही घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण, आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील तेलाच्या वाढत्या किंमती आणि अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध याचा फटका शेअर बाजाराला बसत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राणा कपूर यांना पदावरुन पायउतार होण्यास सांगितले आहे. त्यामुळे येस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 1:34 pm

Web Title: in share market sensex falls by 1100 points
टॅग : Sensex,Share Market
Next Stories
1 शहरांच्या कायापालटात ८ लाख कोटींच्या व्यवसाय संधी!
2 कर्जबाजारी अनिल अंबानी समूहाची व्यवसाय आवराआवर
3 इराणमधून तेल आयात आता रुपयांमध्ये
Just Now!
X