ताजमहाल परिसरातील मशिदीमध्ये परप्रांतीयांना नमाज पढण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. स्मारकाचे जतन होणे सर्वात महत्वाचे आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक असून त्याचे जतन झालेच पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ताजमहालच्या सुरक्षिततेसाठी यावर्षी २४ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाने आदेश काढला होता. फक्त स्थानिकांनाच ज्यांच्याकडे वैध पुरावा आहे त्यांनाच ताजमहालमधल्या मशिदीत नमाज पढण्याची परवानगी मिळेल असे आदेशात म्हटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या आदेशाला याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. शुक्रवारच्या नमाज पठणासाठी ताजमहालच्या परिसरात येणाऱ्या नागरिकांनी ते आग्र्याचे निवासी हे सिद्ध करण्यासाठी सोबत ओळखपत्र आणावे असे जिल्हा प्रशासनाने आदेशात म्हटले होते. ताजमहाल शुक्रवारी पर्यटकांसाठी बंद असते. ताजमहालमधल्या परिसरात काही बांगलादेशी आणि परदेशी नागरिक नमाज पठणाच्या बहाण्याने प्रवेश करत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने परप्रांतीयांवर बंदी घालणारा आदेश काढला होता.

कुठल्या परप्रांतीयाने मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याची जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना लगेच माहिती द्यावी असे आदेशात म्हटले होते. ताजमहालच्या सुरक्षेला कुठला धोका निर्माण होऊ नये म्हणून हा आदेश काढण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In taj mahal mosque ban to non locals for namaz by supreme court
First published on: 09-07-2018 at 16:08 IST