News Flash

ऑनर किलिंगमधून हत्येसाठी १ कोटींची सुपारी, गँगचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध

तीन दिवसांपूर्वी तेलंगणमध्ये गर्भवती पत्नीसमोर पतीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. रुग्णालयाबाहेर ही धक्कादायक घटना घडली होती

तीन दिवसांपूर्वी तेलंगणमध्ये गर्भवती पत्नीसमोर पतीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. तेलंगणच्या नालगोंडा जिल्ह्यात रुग्णालयाबाहेर ही धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांना या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले असून पोलिसांनी बिहारमधून मारेकऱ्यासह एकूण सात जणांना अटक केली आहे. २३ वर्षीय प्रणय कुमारची हत्या करण्यासाठी या गँगला १ कोटी रुपयाची सुपारी देण्यात आली होती.

एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. हत्या करणाऱ्या टोळीचे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंध असल्याचीही माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांना सुपारीच्या रक्कमेपैकी १८ लाख रुपये मिळाले होते. मुख्य मारेकरी गुजरातमधील माजी मंत्री हरेन पांडया यांच्या हत्येमध्येही सहभागी होता.

शुक्रवारी प्रणय कुमार नालगोंडा जिल्ह्यातील रुग्णालयातून पत्नी अमृतासोबत बाहेर पडला. त्यावेळी मारेकरी तिथे आला व त्याने धारदार शस्त्राने वार करुन प्रणयची हत्या केली. अमृताने पोलिसांना दिलेल्या जबानीत तिचे वडिल मारुती राव आणि काका श्रवण राव यांच्यावर संशय व्यक्त केला होता. अमृताच्या कुटुंबाचा या आंतरजातीय लग्नाला विरोध होता.

मारुती राव रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे व्यावसायिक आहेत. श्रीमंत-प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो अशी माहिती पोलिसांनी दिली. अमृताने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रणयशी लग्न केले होते. माझ्या कुटुंबाकडून धोका असल्यामुळे काही काळ आम्ही लपूनही राहिलो होतो. पण अशा प्रकारे हत्या करतील अशी अपेक्षा केली नव्हती असे अमृताने सांगितले. प्रणय आणि अमृताने जानेवारी महिन्यात लग्न केले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 5:25 pm

Web Title: in telgana husbund killed front of wife police arrest accused
Next Stories
1 ‘या’ पाच कारणांमुळे कर्नाटकात कोसळू शकते कुमारस्वामी सरकार
2 पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बलात्कार प्रकरणी तुमचे मौन अमान्य: राहुल गांधी
3 मायावतींनी धुडकावलं, काँग्रेस करणार भीम आर्मीसोबत हातमिळवणी
Just Now!
X