09 July 2020

News Flash

चोवीस तासांत ‘बीएसएफ’चे आणखी ५३ जण करोना पॉझिटिव्ह

सद्यस्थितीस ३५४ जणांवर उपचार सुरू

प्रतिकात्मक छायाचित्र

देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सामान्य नागरिकांबरोबर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस व संरक्षण दलातील जवानांना देखील करोनाची बाधा होत आहे. मागील चोवीस तासांत सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) आणखी ५३ जण करोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. तर चार जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या उपचार सुरू असलेल्यांची एकूण संख्या ३५४ झाली आहे. आतापर्यंत ६५९ जणांनी करोनावर मात केली असल्याची माहिती, बीएसएफकडून देण्यात आली आहे.

या अगोदर काल चोवीस तासांत २१ जवान करोना पॉझिटिव्ह आढळल्याची नोंद झाली होती. तर १८ जणांनी करोनावर मात केली होती.

देशभरात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला, तरी करोनावर मात करणाऱ्यांच्या संख्याही वाढताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशभरात ३ लाख ३४ हजार ८२२ जणांनी करोनावर मात केली आहे. २९ जूनपर्यंत देशभरात एकूण ८६ लाख ८ हजार ६५४ नमूने तपासणी करण्यात आली आहे. यातील २ लाख १० हजार २९२ नमूने काल तपासले गेले आहेत.

देशभरात चोवीस तासांत करोनामुळे ४१८ जणांचा मृत्यू झाला असून, १८ हजार ५२२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ६६ हजार ८४० वर पोहचली आहे. सध्या २ लाख १५ हजार १२५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत करोनामुळे देशभरात एकूण १६ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 11:12 am

Web Title: in the last 24 hours 53 more bsf personnel tested positive for covid 19 msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 “आम्ही १९९९ पर्यंतची युद्ध जिंकली आहेत, आता तुमची वेळ,” चीनवरुन अमरिंदर सिंग यांचा मोदी सरकारवर निशाणा
2 Coronavirus: लग्नानंतर दोनच दिवसांत वराचा मृत्यू; समारंभातील ९५ पाहुणे पॉझिटिव्ह
3 चीनवर होणार अचूक प्रहार, १४ हजार फूट उंचीवर भारताने तैनात केले T-90 भीष्म रणगाडे
Just Now!
X