News Flash

देशात गेल्या २४ तासात आढळले ६२,२२४ नवीन करोना रुग्ण; २५४२ बाधितांचा मृत्यू

दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र अद्यापही करोनाबाधित रूग्णांची मृत्यू संख्या कमी झालेली नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासातील करोना आकडेवारी जाहीर केली

देशातील करोनाची दुसरी लाट ओसरतांना दिसत आहे. दिवसेंदिवस करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, करोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र अद्यापही करोनाबाधित रूग्णांची मृत्यू संख्या कमी झालेली नाही. देशात गेल्या २४ तासात ६२,२२४ नवीन करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर १,०७,६२८ जणांनी करोनावर मात केली आहे. तसेच गेल्या २४ तासात २५४२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार देशातील करोनाची परीस्थिती आटोक्यात येत आहे. आतापर्यंत देशात २,९६,३३,१०५  रुग्ण आढळले आहेत. तर २,८३,८८,१०० बाधितांनी करोनावर मात केली आहे. ३,७९,५७३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ८,६५,४३२ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

नवीन करोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

देशात नवीन करोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. १५ जूनपर्यंत देशभरात २८,००, ४५८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत २६,१९,७२,०१४ नागरीकांचे लसीकरण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 9:45 am

Web Title: in the last 24 hours 62224 new corona patients were found in the country srk 94
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 महागाईत ‘पेट्रोल’चा भडका! मुंबई-पुण्यात प्रति लिटर १०२+, तर परभणीत १०५ रुपयांवर पोहोचले दर
2 Israel Airstrikes in Gaza: आगीच्या फुग्यांना फायटर जेट्सने दिलं उत्तर; सत्तांतरणाच्या तिसऱ्या दिवशीच गाझा पट्टीत हल्ला
3 करोनावर मात केलेल्या रुग्णाला हिरव्या बुरशीचा संसर्ग, देशातील पहिलंच प्रकरण; मुंबईत उपचार सुरु
Just Now!
X