कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पुरुलिया येथील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार सुजय बंदोपाध्याय यांनी बाचाबाचीदरम्यान भाजपचे नेते दीपक बाउरी यांना कथितरीत्या गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. बंदोपाध्याय यांनी मात्र हा आरोप नाकारला आहे. या भागातील एका मतदानकेंद्रावर मतदारांना अडवण्याच्या तृणमूल काँग्रेसच्या प्रयत्नाला आपण विरोध केला असता ‘मी तुम्हाला गोळ्या घालीन’ अशी धमकी बंदोपाध्याय यांनी दिल्याचा दावा भाजप नेते दीपक बाउरी यांनी केला. या कथित बाचाबाचीची चित्रफीत सर्वत्र पसरली. याप्रकरणी चित्रफितीसह तृणमूल उमेदवाराविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याची माहिती भाजपच्या एका नेत्याने दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 28, 2021 1:59 am