News Flash

जगभरात ८ लशींचा बोलबाला!; करोना विषाणू रोखण्यासाठी ठरताहेत प्रभावी

विकसित देशात दररोज लाखो लोकांचं लसीकरण होतं आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत ८ लशींची मात्रा प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.

करोनावर जगात आतापर्यंत ८ लशींची मात्रा प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. (सौजन्य- Indian Express)

चीनमधून उगम पावलेल्या करोना विषाणूनं बघता बघता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं. संपूर्ण जगात आतापर्यंत १७ कोटी ५२ लाख ६३ हजार ४१७ जणांना करोनाची लागण झाली आहे. करोनामुळे जगात आतापर्यंत ३७ लाख ७९ हजार १४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ कोटी ८७ लाख ९३ हजार ९८५ जणांनी करोनावर मात केली आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. करोनाचा वेग पाहता जगभरातून करोनारुपी राक्षसाला दूर ठेवण्यासाठी लस हवी असा एकसूर उमटला होता. शास्त्रज्ञांनी दिवसरात्र एक करून करोनावरील लसींचा शोध लावला. त्यानंतर जगभरात करोना लसीकरण सुरु झालं आहे. विकसित देशात दररोज लाखो लोकांचं लसीकरण होतं आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत ८ लशींची मात्रा प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.

  • कोविशिल्ड– ही लस ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाने तयार केली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु आहे. या लसीचे ठराविक अंतराने दोन डोस दिले जात आहेत. यूके व्हेरिएंट (B117) आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिएंट (B1351) वर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. भारत सरकारने या लसीला मान्यता दिली आहे.
  • कोव्हॅक्सिन– ही स्वदेशी लस आहे. भारत बायोटेकने या लसीची निर्मिती केली आहे. या लसीचे दोन डोस दिल्यानंतर प्रभावी ठरत आहे. ही लस यूके व्हेरिएंटसह अन्य व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. या लसीला भारतात मान्यता देण्यात आली असून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. सध्या या लसीचं २ ते १८ वयोगटातील मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे.
  • स्पुटनिक व्ही– ही रशियन बनावटीची लस आहे. करोनावरील सर्वात प्रथम मान्यता स्पुटनिक व्ही लसीला मिळाली होती. त्यानंतर रशियात लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात आली. भारतीय कंपन्यांच्या माध्यमातूनही या लसींची निर्मिती केली जात आहे. अनेक संशोधनांमध्ये ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे. भारतातही या लसीला मान्यता देण्यात आली आहे.
  • फायझर बायोएनटेक– या लसीचे दोन डोस प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. करोनाच्या यूके व्हेरिएंट, दक्षिण आफ्रिका व्हेरियंट आणि ब्राझील व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
  • मॉडर्ना– फायझरसारखेच या लसीचे दोन डोस देणं प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे. करोनाच्या यूके व्हेरिएंट, दक्षिण आफ्रिका व्हेरियंट आणि ब्राझील व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.
  • जॉन्सन अँड जॉन्सन– ही जगातील एकमात्र अशी लस आहे. त्याचा एक डोस पुरेसा असल्याचं सांगण्यात येत आहे. करोनाच्या यूके व्हेरिएंट, दक्षिण आफ्रिका व्हेरियंट आणि ब्राझील व्हेरिएंटवर याची मात्रा लागू होतेय. मात्र B117 आणि P1 वर तितकी प्रभावी नसल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.
  • सायनोवॅक बायोटेक– ही चीनी बनावटीची लस आहे. या लसीचे दोन डोस प्रभावशाली असल्याचं सांगण्यात येत आहे. करोना विषाणूविरोधात ५० टक्के प्रभावशाली असल्याचं दिसून आलं आहे.
  • नोवाव्हॅक्स– या लसीचे सुद्धा दोन डोस प्रभावी ठरत आहेत. ही लस ८९ टक्के कार्यशील असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. यूके आणि ब्राझील व्हेरिएंट ही लस प्रभावी असल्याचं समोर आलं आहे

देशात आतापर्यंत तीन लशींना मान्यता देण्यात आली आहे. यात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लसीचा समावेश आहे. आतापर्यंत देशात २४ कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष जो बायडेन यांनी जगभरात करोना विषाणूचा घातक परिणाम पाहता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमेरिका प्रशासन करोना लस दान करण्यासाठी फायझर बायो एन टेक लशीचे ५० कोटी डोस खरेदी करत आहे. अमेरिकन माध्यमांनी याचा खुलासा केला.

करोनामुळे ऑक्सिजन पातळीत कमी झाल्यानंतर मेंदूवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता!

देशात गेल्या २४ तासात एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे ६,१४८ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांचा आकडा तीन लाख ५९ हजार ६७६ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या मृत्यूंची संख्या तीन हजारांच्या खाली आली होती. मात्र, आता झालेली वाढ चिंताजनक आहे. देशातला मृत्यूदर आता १.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 9:04 pm

Web Title: in the world eight vaccine are developed and stay away from covid 19 and its impact rmt 84
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 काखेत कळसा अन्… बेपत्ता तरुणीने ११ वर्षांपासून शेजारच्याच घरात प्रियकरासोबत थाटला संसार
2 आता ग्राहकांना हव्या त्या वितरकाकडून घेता येणार सिलेंडर; पुण्यात प्रायोगिक तत्वावर होणार सुरुवात!
3 उत्तर प्रदेशात राजकीय हालचालींना वेग; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची दिल्लीवारी
Just Now!
X