28 September 2020

News Flash

संकट काळात काँग्रेस पक्ष सरकारला पूर्णपणे साथ देणार, सहकार्य करणार – सोनिया गांधी

पंतप्रधान मोदींनी या संकटकाळात सत्य आणि तथ्याच्या आधारावर देशाला विश्वास द्यावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी. (संग्रहित छायाचित्र)

“गलवाण खोऱ्यात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. संकटाच्या या काळात काँग्रेस पक्ष पूर्णपणे सरकारला सहकार्य करेल व साथ देईल” असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी सांगितले. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर लढताना शहीद झालेल्या भारताच्या २० वीर सैनिकांना त्यांनी नमन केले. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

गेल्या दीड महिन्यापासून चिनी सैन्याने लडाखमध्ये घुसखोरी केली आहे. देशात सध्या प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी समोर येऊन सत्य सांगितले पाहिजे असे सोनिया गांधी म्हणाल्या. “चिनी सैन्याने भारतीय प्रदेशावर कसा ताबा मिळवला? भारतीय सैनिक का शहीद झाले?. सध्या तिथे काय परिस्थिती आहे? आमचे अजून किती सैनिक बेपत्ता आहेत, किती सैनिक जखमी झालेत?” याची पंतप्रधानांनी देशाला माहिती द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

“चीनने कुठल्या भागावर ताबा मिळवला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सरकारचा विचार, धोरण, योजना काय आहे?” असे सोनिया गांधी म्हणाल्या. “संकटकाळात काँग्रेसपक्ष सैन्य आणि सरकारसोबत आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत देश एकजूट होऊन शत्रूचा सामना करेल” असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी या संकटकाळात सत्य आणि तथ्याच्या आधारावर देशाला विश्वास द्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 4:18 pm

Web Title: in this time of crisis congress party is standing with modi govt sonia gandhi dmp 82
Next Stories
1 पंतप्रधान मोदींसोबत १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली
2 “डिवचलं तर भारत जशास तसं उत्तर देण्यास समर्थ”, मोदींनी चीनला ठणकावलं
3 चीन सैन्याशी दोन हात करणाऱ्या २० शहीद जवानांची नावं लष्कराकडून प्रसिद्ध
Just Now!
X