News Flash

तीन-चार महिन्यांत देशातील नागरिकांना करोनावरील लस मिळेल – डॉ. हर्षवर्धन

शेतकरी आंदोलकांना कोविडचे नियम पाळण्याची केली विनंती

पुढच्या वर्षी पहिल्या तीन-चार महिन्यांत देशातील जनतेला करोनावरील लस पुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. तसेच त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व जनतेला ही लस पुरवली जाईल, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, “पुढील वर्षाच्या पहिल्या तीन ते चार महिन्यांत देशातील जनतेला लसीचा पुरवठा करण्यात आपण सक्षम असू. त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये २५ ते ३० कोटी जनतेला लस पुरवण्याची योजना आम्ही आखली आहे.”

दरम्यान, दिल्लीतील बुरारी येथील निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करत असलेल्या शेकडो आंदोलकांना आवाहन करताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले, “माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कोविडचे नियम लक्षात ठेवावेत तसेच त्यानुसार वर्तन करावं. यामध्ये तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्यासाठी ही महत्वाची बाब आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 2:57 pm

Web Title: in three four months the citizens of the country will get the vaccine against corona says dr harshavardhana aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रिक्षाच्या चाकात महिलेच्या गळयातील ओढणी अडकली आणि…
2 “मी एक लैला अन् माझे हजारो मजनू”; आरोप करणाऱ्या विरोधकांना ओवेसींचा टोला
3 ‘ब्रह्मपुत्रा’वर चीन बांधणार महाकाय धरण; ईशान्य भारतात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती
Just Now!
X