करोना विषाणूच्या प्रसारासंदर्भात रोज नव्याने चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. अमेरिकेमधील ओरिगॉन येथे ब्रिटनमधील नव्या प्रकारच्या करोना विषाणूचे बदलेले स्वरुप म्हणजेच म्युटेड व्हेरिएंट आढळून आला आहे. हा विषाणू ब्रिटनमधील विषाणूपेक्षा अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विषाणूची रचना ही दोन वेगवेगळ्या विषाणूंमधील रचना एकत्र येत झाली आहे. त्यामुळे यावर करोनाच्या लसीचा फारसा परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आरोग्यतज्ज्ञांनी या विषाणूसंदर्भात सर्वांनीच अधिक सावध राहण्याची गरज आहे असं म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलं आहे. हा विषाणू वेगाने पसरण्याबरोबरच सतत त्यामध्ये बदल होत असल्याने यावर लस निष्प्रभ ठरेल अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
दिलासादायक बातमी… करोना लसीकरण अधिक स्वस्त, झटपट होणार; भारत बायोटेकच्या Nasal Vaccine ची चाचणी लवकरचhttps://t.co/nAMRGh5HsA
सध्या भारतामध्ये दोन इंटरामस्कुलर लसींना परवानगी देण्यात आलीय#CoronaVaccine #coronavirus #CoronaVirusUpdates #Corona #BharatBiotech— LoksattaLive (@LoksattaLive) March 5, 2021
दोन वेगळ्या विषाणूंमधील रचनेपासून नव्याने तयार झालेली रचना असणाऱ्या विषाणूचा संसर्ग झालेला एकच रुग्ण आढळून आला आहे. मात्र यासंदर्भात जेनेटिक्समधील तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार या विषाणूचा आधीपासूनच फैलाव सुरु झालाय. हा विषाणू एकाच रुग्णात तयार झालेला नाही. ओरिगॉन हेल्थ अॅण्ड सायन्स युनिव्हर्सिटीचे ब्रायन ओ रॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा विषाणू जगातील इतर भागांमधून इथे आलेला नाही. तर अचानक या नव्या प्रकारच्या विषाणूचा शोध लागालाय.” रॉक आणि त्यांचे सहकारी या नव्या व्हेरिएंटची निर्मिती कशी झाली यासंदर्भात सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शनची मदत करत आहेत. संशोधनासंदर्भातील माहिती रॉक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी संस्थांसोबत शेअर केलीय.
नक्की वाचा >> पाच लाख करोनाबळी… अमेरिकेत करोना कहर थांबेना; राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले, “एक देश म्हणून आपण…”
समजून घ्या: ‘कोव्हॅक्सिन’, ‘कोव्हिशिल्ड’ कोणी घेऊ नये?, लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसल्यास काय करावं?https://t.co/xrpKC3E1Fg
सर्वसामान्यांच्या मनामध्ये लसीच्या साइड इफेक्ट्ससंदर्भात संभ्रम#Corona #Vaccination #sideeffects #covishield #covaxin #coronavirus #COVID19 #FYILS— LoksattaLive (@LoksattaLive) March 3, 2021
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या बी वन वन वन सेव्हन या विषाणूचा वेगाने अमेरिकेमध्ये प्रादुर्भाव होताना दिसत आहे. सामान्य करोना विषाणूपेक्षा हा नवा विषाणू अधिक वेगाने पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच नव्या विषाणूमुळे येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जातेय. ओरिगॉनमध्ये आढळून आलेल्या या नव्या प्रकारच्या विषाणूमध्येही म्युटेशन म्हणजेच बदल आढळून आलाय. हा बदल दक्षिण आफ्रीका, ब्राझील आणि न्यूयॉर्क शहरामध्ये पसरणाऱ्या करोनाच्या नव्या विषाणूमध्येही आढळून आला होता.
मोदींच्या लसीकरणाचे फोटो: जाणून घ्या कोणती लस घेतली?, पुढील डोस कधी? अन् लस घेतल्यावर ते काय म्हणाले?https://t.co/fwyVflSHxg
जाणून घ्या मोदींच्या करोना लसीकरणासंदर्भातील सर्व तपशील#PMModi #coronavirus #CoronaVaccine #COVID19 #Modi #AIIMS #Delhi #PNiveda— LoksattaLive (@LoksattaLive) March 1, 2021
दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या क्लीनिकल ट्रायल्समध्ये ईईके म्युटेशनमध्ये रोगप्रतिकारशक्तीला नुकसान पोहचत असल्याचे दिसून आलं. हा विषाणू सध्याच्या करोना लसीचा प्रभाव कमी करतो असंही यात दिसून आलं. करोनाची लस प्रभावशाली ठरणार असली तरी तिचा प्रभाव या नवीन विषाणूविरोधात तुलनेने कमी असेल. त्यामुळेच फाइजर-बायोएनटेक तसेच मॉडर्ना कंपनीने नव्या लसीच्या चाचण्याही सुरु केल्यात. ब्रिटनमधील ईईकेसोबत बी वन वन सेव्हनचं म्युटेशन दिसून आलं आहे. हा बाब चिंताजनक असल्याचं संशोधक सांगत आहेत. डॉक्टरांच्या अंदाजानुसार ओरिगॉनमधील नवा विषाणू हा इथेच निर्माण झालेला आहे.
नक्की वाचा >> बिल गेट्स म्हणतात, ‘भविष्यात ‘या’ दोन गोष्टींसाठी तयार राहिलो नाही तर लाखो लोकांचा मृत्यू अटळ’
आपण आपल्या देशातील लोकांना लस देण्याऐवजी लसीचे डोस इतर देशांना दान करतोय किंवा विकतोय : उच्च न्यायालयhttps://t.co/hvQs51vBZG
कोणाला लस द्यावी यावर नियंत्रण ठेवण्यामागील तर्कसंगती काय हे ही स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश#CoronavirusVaccine #COVID19 #DelhiHighCourt— LoksattaLive (@LoksattaLive) March 5, 2021
अशाप्रकारे दोन वेगळ्या विषाणूंमधील म्युटेशन एकाच वेळी दिसून नवा विषाणू निर्माण होणे हे आश्चर्यकारक असल्याचं संशोधक सांगतात. कारण ईईके म्युटेशन जगभरातील सर्वच विषाणूंमध्ये पहायला मिळत आहे. मात्र बी वन वन सेव्हनचे म्युटेशन हे नव्याने आढळून आलं आहे. ब्रिटनमध्ये आधी कमी रुग्ण सापडले. मात्र म्युटेशननंतर देशभरामध्ये हा विषाणूचा फैलाव झाल्याचे पाहायला मिळालं. तज्ज्ञांनी या नव्या व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नसल्याचं सांगत लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 8, 2021 10:34 am