18 September 2020

News Flash

धक्कादायक! आंब्याच्या बागेत सापडला महिलेचा खाटेला बांधलेला मृतदेह

मृतदेहाजवळ एक जिवंत आणि एक वापरलेलं अशी दोन काडतुस सापडली आहेत.

संग्र

उत्तर प्रदेशात अत्यंत क्रूर पद्धतीने एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह खाटेला बांधण्यात आला होता. शुक्रवारी रात्री बिजनौर जिल्ह्यातील गजरोलामध्ये आंब्याच्या बागेमध्ये हा मृतदेह सापडला. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आधी गोळी झाडून हत्या करण्यात आली ?
मृतदेहाजवळ एक जिवंत आणि एक वापरलेलं अशी दोन काडतुस सापडली आहेत. या महिलेची आधी गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे. महिलेची ओळख पटवण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. मृतेदह ओळखता येण्यापलीकडे जळाला आहे.

गजरोलामध्ये एका आंब्याच्या बागेमध्ये हा मृतदेह सापडला. नोएडामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीकडे या बागेची मालकी आहे. या बागेमध्ये गस्त घालणाऱ्या वॉचमनचे या मृतदेहावर लक्ष गेले. त्याने लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 1:54 pm

Web Title: in uttar pradesh bijnor womans burnt body found in mango orchard dmp 82
Next Stories
1 या मुस्लीम देशाच्या नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो!
2 “दोषींना माफ करा हे विचारायची हिंमतच कशी होते?”; निर्भयाच्या आईचा इंदिरा जयसिंहांना सवाल
3 राहुल गांधींना खासदार म्हणून निवडणं हा केरळवासियांचा विनाशकारी निर्णय-रामचंद्र गुहा
Just Now!
X