देशात गेल्या पाच आठवडय़ांपासून दरदिवशी करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे दरदिवशी नव्याने लागण होणाऱ्यांहून अधिक आहे तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतील घटही कायम असून त्यांचे प्रमाण देशातील एकूण बाधितांच्या संख्येच्या केवळ ६.१९ टक्के इतके आहे, असे शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशात २४ तासांत ५० हजारांहून कमी लोकांना करोनाची लागण झाली असून दररोज बरे होणाऱ्यांची संख्या ५४ हजारांपेक्षा अधिक आहे. दररोज ७३ हजार नव्या बाधितांची नोंद होत होती ती संख्या आता दरदिवशी ४६ हजारांवर आली आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.