07 March 2021

News Flash

पॅराडाईजप्रकरणी प्राप्तिकर खात्याकडून अखेर खटले दाखल

‘पॅराडाईज पेपर्स’प्रकरणात प्राप्तिकर खात्याने अखेर दोन वर्षांनंतर गुन्हे दाखल केले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली

देशात करचुकवेगिरी करून परदेशातील बोगस कंपन्यांमध्ये पैसा गुंतवून काळा पैसा निर्माण करणाऱ्या ‘पॅराडाईज पेपर्स’प्रकरणात प्राप्तिकर खात्याने अखेर दोन वर्षांनंतर गुन्हे दाखल केले आहेत.

जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने जागतिक पातळीवर तब्बल दहा महिने छडा लावून हा भ्रष्टाचार उघडकीस आणला. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने भारतातील पडताळणीत महत्त्वाची भूमिका बजावली.

बम्र्युडातील अ‍ॅपलबाय, सिंगापूर येथील एशियासिटीसह १९ कंपन्यांचा वापर करून भारतीयांचा काळा पैसा परदेशातील बोगस कंपन्यात गुंतवला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे देशातील नियामक यंत्रणेला अंधारात ठेवून परदेशातील बोगस कंपन्यांनी कर्जउभारणी केल्यावर त्यासाठी भारतीय कंपन्यांच्या मालमत्तांची हमी दिली जात होती.

एप्रिल २०१६मधील पनामा पेपर्स प्रकरणी चौकशी करणाऱ्या गटाकडूनच पॅराडाईज पेपर्स प्रकरणात तपास केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्रालयाने केली होती. त्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) या यादीत नावे असलेल्या सर्व भारतीयांना नोटिसा पाठविल्या होत्या.

आता या प्रकरणात माल्टा आणि बम्र्युडा येथे गुंतवणूक केल्याप्रकरणी ज्यांची नावे आहेत अशांविरोधात लखनऊ, मुंबई आणि चेन्नई येथे पहिल्या टप्प्यात खटले भरण्यात येणार आहेत. यात मुंबईत रितेश जैन (गोल्डबर्ड होल्डिंग्ज ही कंपनी माल्टात २००९मध्ये स्थापली), लखनऊ न्यायालयात गाझियाबाद येथील रविकुमार (माल्टामध्ये २०१२साली बापू इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनी स्थापली), सत्येंद्र एन. बंडोपाध्याय (२०१२मध्ये बम्र्युडात अल्फा थॉट ग्लोबल लि. ची स्थापना. तिचा उपाध्यक्ष),  चेन्नईत अनंथ आणि अर्जुन (बम्र्युडात सेलेट्रॉनिक्स इंटरनॅशनल लि. कंपनी स्थापन. तिचा समभागधारक).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 2:46 am

Web Title: income tax department filed fir in paradise papers leak
Next Stories
1 ‘अदानी’ला पाच विमानतळांचे कंत्राट
2 पुलवामा हल्ला: NIA ला मोठे यश, कार मालकाची ओळख पटली
3 काहींसाठी देश नव्हे तर कुटुंब महत्वाचे, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
Just Now!
X