News Flash

गडकरींच्या पूर्ती कंपनीशी संबंधीत मुंबईतील नऊ ठिकाणांवर प्राप्तीकर खात्याचे छापे

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहातील मुंबईत नोंदणी झालेल्या कंपन्यांची चौकशी प्राप्तिकर खात्यामार्फत करण्यात येत आहे. पूर्ती कंपनीशी संबंधीत मुंबईतील नऊ ठिकाणांवर

| January 22, 2013 04:11 am

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहातील मुंबईत नोंदणी झालेल्या कंपन्यांची चौकशी प्राप्तिकर खात्यामार्फत करण्यात येत आहे. पूर्ती कंपनीशी संबंधीत मुंबईतील नऊ ठिकाणांवर प्राप्तीकर खात्यामार्फत आज (मंगळवार) छापे टाकण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच गडकरी यांच्या कंपनीशी संबंधित अशा मुंबई, पुणे, नागपूर व कोलकाता येथील १२ ठिकाणांवर छापे मारण्यात आले होते. बुधवारी गडकरी दुस-यांदा भाजपच्या अक्षपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आल्याने गडकरी आणि भाजपही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पूर्ती कंपनीतील कथित गैरव्यवहारामुळे गडकरींनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पक्षातीलच विरोधकांनी केली होती. तसेच भाजप नेते महेश जेठमलानी यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे गडकरींसमोरील अडचणींमध्ये भर पडतानाच दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 4:11 am

Web Title: income tax department starts field inquiries at firms connected to nitin gadkaris purti group
टॅग : Nitin Gadkari
Next Stories
1 शिंदे दहशतवाद्यांचे लाडके!
2 कर्करोगास कारण ठरणा-या चारपदरी डीएनएचा शोध
3 दिल्लीत ४ लाख कुटुंबांना १२ सिलेंडर्स मिळणार
Just Now!
X