27 September 2020

News Flash

तामिळनाडूत १०० ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे

अवैध खाणकाम प्रकरणातील आरोपी ए वईकुंदराजनची कंपनी व्ही व्ही मिनरल्सवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे.

संग्रहित छायाचित्र

तामिळनाडूतील अवैध खाणकाम प्रकरणातील आरोपी ए वईकुंदराजनची कंपनी व्ही व्ही मिनरल्सवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. त्याचबरोबर राज्यातील वईकुंदराजनच्या १०० वेगवेगळ्या ठिकाणांवरही तपास सुरु आहे. वईकुंदराजनवर मोठ्या प्रमाणावर अवैध खाणकामाचा आरोप आहे. त्याची कंपनी व्ही व्ही मिनरल्स गार्नेट, इल्मेनाइट आणि रुटाइल सारख्या दुर्मीळ खनिजांचा देशातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे.

वईकुंदराजन हा अब्जाधीश असला तरी त्याचे राहणीमान अत्यंत साधे असल्याचे बोलले जाते. पांढरा शर्ट, धोतर आणि बहुतांशवेळा तो अनवाणीच असतो, असेही सांगितले जाते. देशातील खनिज बीच मिनरल्समधील एकूण ६४ परवान्यांपैकी ४५ परवाने वुईकुंदराजन कुटुंबीयांकडे आहेत. यातील बहुतांश त्याच्या भावाकडे आहेत. वईकुंदराजनविरोधात २०० फौजदारी खटले आणि किमान १५० दिवाणी खटले सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2018 2:51 pm

Web Title: income tax officials conducting searches at vv minerals and its 100 locations in tamil nadu
Next Stories
1 गाडी चालवताना पावसाचे फोटो काढल्यास १६ हजार रुपये दंड
2 सीबीआयच्या तीन प्रमुखांच्या गच्छंतीस कारणीभूत ठरलेला ‘मोईन कुरेशी’
3 धार्मिक संस्थांमध्येही विशाखा गाइडलाइन लागू करण्याची मागणी; सुप्रीम कोर्टात जनहित याचिका
Just Now!
X