29 November 2020

News Flash

करदात्यांना मोठा दिलासा! आयकर भरण्याची तारीख वाढवली

कधीपर्यंत भरता येणार प्राप्तीकर?

प्रातिनिधीक छायाचित्र

केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आयकर भरण्यासाठीच्या कालावधीत वाढ केली आहे. आयकर भरण्यासाठी केंद्रानं आधी ३० नोव्हेंपर्यंत कालावधी निश्चित केला होता. त्याला त्याला पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे करोना व लॉकडाउनमुळे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयानं वैयक्तिक आयकरदात्यांना २०१९-२० या वर्षातील कर भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून दिली आहे. मंत्रालयानं शनिवारी ही माहिती दिली. आयकर भरण्यासाठी यापूर्वी ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती.

केंद्र सरकारनं १३ मे रोजी आयकर भरण्यासाठी निश्चित केलेली ३१ जुलैपर्यंतची तारीख वाढवून ३० नोव्हेंबर केली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं (CBDT) त्यावेळी असं म्हटलं होतं की, करोना संकटामुळे करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंतच्या कालावधी वाढवण्यात येत आहे.

प्राप्तीकर अधिनियमानुसार ज्यांच्या खात्यांचं ऑडिट करणं आवश्यक आहे, अशा करदात्यांसाठी (त्यांच्या भागादारांसह) आयकर विवरणपत्र देण्याची तारीख ३१ ऑक्टोबरऐवजी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. करोनाच्या संकटामुळे आयकर भरण्यासाठी कालावधीत केंद्र सरकारकडून तब्बल चार वेळा वाढवण्यात आला आहे. यापूर्वी ३१ मार्चवरून ३० जून करण्यात आला होता. त्यानंतर ३१ जुलै आणि नंतर ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 4:22 pm

Web Title: income tax return filing deadline for fy20 extended till december 31 bmh 90
Next Stories
1 आदित्य बिर्ला फॅशनमध्ये ‘फ्लिपकार्ट’ची हिस्सेदारी
2 व्याजदर कपात महागाईवर नियंत्रणानंतरच – गव्हर्नर दास
3 बाजार-साप्ताहिकी : निकालांचा मागोवा