News Flash

नोटाबंदीचा परिणाम; आयकर भरणाऱ्यांच्या प्रमाणात २५ टक्क्यांनी वाढ

२.८२ कोटींहून अधिकांनी आयकर भरला

संग्रहित छायाचित्र

नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर आयकर भरणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ५ ऑगस्टपर्यंत २ कोटी ८२ लाखांहून अधिक लोकांनी आयकर भरला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ २५ टक्के इतकी आहे. मागील आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्यांचे प्रमाण २ कोटी २६ लाख इतके होते. यामध्ये यंदाच्या वर्षात लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

मागील वर्षी २ कोटी २६ लाख लोकांनी आयकर भरला होता. यंदा त्यामध्ये २५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील वर्षाचा विचार केल्यास त्यावेळी आयकर भरणाऱ्यांच्या प्रमाणात ९.९ टक्के इतकी वाढ झाली होती. यंदा आयकर भरणाऱ्यांचे प्रमाण २५.३ टक्क्यांनी वाढले आहे. यंदा ५ ऑगस्टपर्यंत एकूण २ कोटी ८२ लाख ९२ हजार ९५५ लोकांनी आयकर भरला. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लोक कर यंत्रणेच्या अंतर्गत आले आहेत. नोटाबंदीचा परिणाम आगाऊ कर भरणा करणाऱ्यांच्या संख्येवरही दिसून आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आगाऊ कर भरणा करणाऱ्यांचे प्रमाण ४१.७९ टक्क्यांनी वाढले आहे.

‘कर भरणाऱ्या लोकांच्या संख्येत २५.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ५ ऑगस्टपर्यंत २ कोटी ७९ कोटींहून अधिकांनी आयकर भरला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा खूप जास्त आहे. त्यामुळे नोटाबंदीने मोठ्या संख्येने लोक कर यंत्रणेच्या अंतर्गत आले आहेत,’ असे केंद्रीय प्रत्यक्ष कर संचालनालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ‘अधिकाधिक लोकांना कर रचनेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासोबतच काळा पैसा बाळगणाऱ्यांवर आणि कर बुडवणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. काळा पैसा बाळगणाऱ्यांवर आणि कर चुकवणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाईदेखील केली जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे,’ असेदेखील या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 7:55 pm

Web Title: income tax returns filing in current fiscal year increase by 25 percent
Next Stories
1 जीएसटी परिषद आता उत्पादनांच्या सुधारित दरांची यादी आणणार
2 काश्मीरची स्वायत्तता संपवाल तर याद राखा, फारुख अब्दुल्लांचा भाजपला इशारा
3 वृथा राष्ट्रवाद असुरक्षिततेचे लक्षण- हमीद अन्सारी
Just Now!
X