दिल्लीत गेल्या काही दिवसात आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसाला ७० ते ८० आग लागल्याचे कॉल्स अग्निशमन विभागाला प्राप्त होत आहेत. गेल्या दहा दिवसांची आकडेवारी पाहिली तर दिवसाला १०० कॉल्सची नोंद करण्यात आली आहे. मार्च महिन्यात तर दिल्लीत २,५७३ ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या मार्चमध्ये आग लागण्याचं प्रमाण वाढलंय. गेल्यावर्षी १६०० आग लागल्याचे कॉल्स आले होते.

यावर्षी जानेवारी महिन्यात १८५१, फेब्रुवारी महिन्यात १७०० तर मार्चमध्ये २५७३ आग लागल्याचे कॉल्स आल्याचं दिल्ली अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तापमान वाढल्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं अग्निशमन दलांकडून सांगण्यात येत आहे.

‘या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी अग्निशमनदल सज्ज आहे. गांभीर्य लक्षात घेत कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तापमान वाढीमुळे शेतात सर्वाधिक आग लागत असल्याचं दिसतंय. त्यासाठी विशेष योजना तयार केली आहे.’, असं अग्निशमनदलाचे अधिकारी अतुल गर्ग यांनी सांगतिलं.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय!; ‘रेमडेसीवर’ची निर्यात थांबवली

दिल्लीत मार्चमध्ये ३३.१ इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलीय. गेल्या ११ वर्षातील ही सर्वाधिक तापमानाची नोंद आहे. तर २९ मार्चला तापमान ४०.१ इतकं होतं. त्या दिवशी १३६ आग लागल्याचे कॉल्स अग्निशमन विभागाला प्राप्त झाले होते.

धडकी भरवणारी आकडेवारी! देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण

दिल्लीसोबतच देशातील इतर ठिकाणीही आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं दिसून आहे. तापमानात वाढ झाल्याने आग लागण्याचे प्रमाण वाढलं असल्याचं बोललं जात आहे.