करोना विषाणूपासून संरक्षण मिळवण्यासाठी सगळे जग धडपडत असले तरी त्यासाठी प्रतिकारशक्ती उत्तम राखणे हाच एक उपाय आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या मदतीने आपली प्रतिकारशक्ती वाढवा, असा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे.

भारताच्या पारंपरिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवता येते. त्यासाठी तुळस, दालचिनी, काळी मिरी व सुंठ यांचा वापर करणे गरजेचे आहे असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे.  पंतप्रधान मोदी यांनीही अलीकडे आयुर्वेदाच्या लाभांकडे लक्ष वेधले होते.

काय करावे?

* आयुष मंत्रालयाने ज्या सल्ला सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार गरम पाण्याचे सेवन, योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा यांच्या मदतीने प्रतिकारशक्ती वाढते.

* रोज तीस मिनिटे तरी योगासने करण्याची गरज आहे. हळद, जिरे, कोथिंबीर, लसूण यांचा वापरही प्रतिकारशक्ती वाढवण्यास गरजेचा आहे.

* रोज दहा ग्रॅम च्यवनप्राश सकाळी सेवन करणे, गूळ, ताज्या लिंबाचा रस यातूनही प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

* रोज १५० मि.ली गरम दूध हळद टाकून दिवसातून दोनदा घेणे गरजेचे आहे. नाकपुडीत सकाळ -सायंकाळ तीळ तेल किंवा खोबरेल किंवा शुद्ध तूप घालावे.