01 October 2020

News Flash

शिवराजसिंह चौहान यांच्या रुग्णालयातील मुक्कामात वाढ

करोनावर उपचार घेण्याकरिता चौहान २५ जुलैपासून भोपाळमधील चिरायु वैद्यकीय रुग्णालयात आहेत

संग्रहित छायाचित्र

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची नवव्या दिवशी करण्यात आलेली कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच एका मंत्र्यांनी सांगितले.

करोनावर उपचार घेण्याकरिता चौहान २५ जुलैपासून भोपाळमधील चिरायु वैद्यकीय रुग्णालयात आहेत. नवव्या दिवशी त्यांची आरटी-पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांची इतर वैद्यकीय निकष सामान्य आहेत, रुग्णालयाने म्हटले आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी होणार असलेली बैठक आभासी पद्धतीने होईल असे ते म्हणाले.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या कार्यालयातील ६ कर्मचाऱ्यांनाही  करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी सोमवारी दिली. मुख्यमंत्र्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 12:04 am

Web Title: increase in hospital stay of shivraj singh chouhan abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याची संधी भारताला द्या’
2 “करोनावरची लस आली तरीही जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे स्थिती बदलणार नाही”
3 “सरकारी रुग्णालय असणाऱ्या AIIMS ऐवजी शाह शेजारच्या राज्यातील खासगी रुग्णालयात का दाखल झाले?”; काँग्रेस खासदाराचा प्रश्न
Just Now!
X