15 December 2019

News Flash

भारतात मानसिक आजारांचे प्रमाण वाढणार..

पुढील १० वर्षांत चीनपेक्षा भारतात मानसिक आजाराच्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे एका अहवालात म्हटले

पुढील १० वर्षांत चीनपेक्षा भारतात मानसिक आजाराच्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे एका अहवालात म्हटले असून जागतिक पातळीवरील मानसिक आजाराचे हे प्रमाण या दोन देशांमध्ये एकतृतीयांश इतके आहे, असेही या अहवालात सांगितले आहे.
भारतात हे प्रमाण वाढत असले तरी मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या प्रत्येक १० व्यक्तींपैकी एक व्यक्ती पुरावाधिष्ठित उपचार करण्याचा विचार करते, असे माहितीत दर्शविले आहे. ‘लॅन्सेट’मध्ये गुरुवारी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भारत-चीन मानसिक आजाराबाबत एक दीर्घ मुदतीचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्यामध्ये दोन्ही देशांतील तज्ज्ञ मानसिक आजाराची सद्य:स्थिती पाहणार आहेत.
जागतिक पातळीवरील मानसिक आजाराच्या प्रमाणापैकी केवळ चीनमध्ये १७ टक्के इतके प्रमाण आहे, तर भारतात हेच प्रमाण १५ टक्के इतके आहे. दोन्ही देशांमध्ये वेड लागण्याचे प्रमाणही वाढत आहे. एका संशोधनानंतर हे मत मांडण्यात आले.

First Published on May 19, 2016 12:40 am

Web Title: increase mental diseases in india
टॅग Depression
Just Now!
X