पंतप्रधान नरेंद्र मोदींंनी मंगळवारी स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यावरुन दिलेलं भाषण गेल्या चार वर्षातील सर्वात छोटं भाषण ठरले आहे. मोदी आज फक्त ५७ मिनिटे बोलले असून गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी मोदींनी तब्बल ९६ मिनिटांचे भाषण केले होते.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांचे भाषण मोठे असते अशा तक्रारी नरेंद्र मोदींकडे आल्या होत्या. ‘मन की बात’मध्ये खुद्द मोदींनीच ही माहिती दिली होती. माझे यंदाचे भाषण छोटेखानी असेल असे मोदींनी आधीच जाहीर केले होते. ‘मन की बातम’ध्ये दिलेला शब्द पाळत मोदींनी आज (मंगळवारी) लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित केले. मोदींनी फक्त ५७ मिनिटांचे भाषण केले. गेल्या चार वर्षातील मोदींचे हे सर्वात छोटे भाषण ठरले. गेल्या वर्षी मोदींनी ९६ मिनिटांचे भाषण केले होते. मोदींनी २०१५ मध्ये ८६ मिनिटे तर २०१४ मध्ये ६५ मिनिटांचे भाषण केले होते.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
March 2024, March 2024 Records Hottest Temperatures, March 2024 Records Hottest in 175 Years, hottes march 2024 globally, Global Average Temperatures Up by 1.35°C, heat, summer march, summer season
यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?

मोदींपूर्वी तब्बल १० वर्ष पंतप्रधानपदावर असलेले मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात एकदाच ५० मिनिटांचे भाषण केले होते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी १९४७ मध्ये ७२ मिनिटांचे भाषण केले होते. २०१५ मध्ये मोदींनी हा विक्रम मोडला होता. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वातंत्र्य दिनी सर्वात छोटे भाषण केले होते. वाजपेयी यांनी स्वातंत्र्यदिनी सरासरी ३० ते ३५ मिनिटांचे भाषण केले होते. २००२ मध्ये वाजपेयींनी सर्वात कमी म्हणजेच २५ मिनिटांचे भाषण केले होते. तर २००३ मध्ये त्यांनी ३० मिनिटांचे भाषण केले होते.

दरम्यान, मंगळवारच्या भाषणात मोदींनी कथित संस्कृती रक्षकांना सुनावले. देश एकता, शांती आणि सद्भावनेवर चालतो, जातीयवादाचे विष कधीही देशाचे भले करु शकणार नाही. आस्थेच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून घेणार नाही असे मोदींनी ठणकावले.