28 February 2021

News Flash

इस्त्रायलकडून राफेल क्षेपणास्त्र खरेदीचा प्रस्ताव पुन्हा विचाराधीन

पाकिस्तानविरोधातील लष्करी क्षमता वाढवण्यासाठी भारत इस्त्रायलकडून स्पाइक ही क्षेपणास्त्रे खरेदी करण्याच्या बेतात आहे

संग्रहित छायाचित्र

पाकिस्तानविरोधातील लष्करी क्षमता वाढवण्यासाठी भारत इस्त्रायलकडून स्पाइक ही क्षेपणास्त्रे खरेदी करण्याच्या बेतात आहे. या क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानच्या रणगाड्यांना भेदण्याच्या भारताच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. येत्या तीन वर्षांमध्ये भारतीय संस्था स्वदेशी क्षेपणास्त्रांची निर्मिती करणार आहेत. परंतु तोपर्यंत गरज पडली तर रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांसाठी स्पाइकची खरेदी करण्यात येणार आहे.

हा खरेदी करार सध्या अंतिम टप्प्यात असून आता केंद्र सरकारची मंजुरी केवळ शिल्लक असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. भारतीय लष्कराला या प्रकारच्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांची निकड असून या वर्षातच इस्त्रायलची कंपनी राफेलशी खरेदी करार केला जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. राफेलच्या प्रवक्त्याने अशी चर्चा सुरू असल्याच्या वृत्तावर शिक्कमोर्तब केले आहे. मात्र, जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत निश्चित माहिती देण्यास नकार दर्शवला आहे.

विशेष म्हणजे इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यानाहू नवी दिल्लीला भेट देणार आहेत. हा खरेदी करार करण्याचे यापूर्वी ठरले होते, परंतु काही कारणानं तो रद्द झाला होता, याबाबत नेत्यानाहू यांनी मोदींकडे विचारणा केल्यानंतर या चर्चा पुन्हा रूळावर आल्या आहेत. भारताच्या डिफेन्स रीसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) भारतीय बनावटीची रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे बनवण्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे इस्त्रायलसोबतचा करार मागे पडला होता. भारताला सुमारे आठ हजार रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची आवश्यकता आहे. या वर्षाअखेरीस या प्रकारच्या क्षेपणास्त्राची चाचणी डीआरडीओ घेणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्या तर डीआरडीओ 2021 पर्यंत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकेल. परंतु दरम्यानच्या काळात आवश्यकता भासल्यास उपाययोजना म्हणून इस्त्रायलकडून राफेलच्या खरेदीचा प्रस्ताव स्वीकारण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सौदी अरेबियामधली पुरूषप्रधान संस्कृती नष्ट व्हावी व महिलांना गाडी चालवण्यासारखे हक्क मिळावेत यासाठी अनेक संस्था प्रयत्नशील आहेत. अशा संघटनांच्या 11 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असलेल्या संस्थांनी या मॅगेझिनच्या विरोधात कडक शब्दांमध्ये टीका केली आहे, असे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 4:15 pm

Web Title: india again mulling option to purchase rafael missiles from israel
Next Stories
1 आंबेडकरांच्या पुतळ्याचं पुन्हा भगवीकरण, भाजपा नेत्याचा सहभाग
2 …तर पेट्रोल डिझेलचे दर ७ ते ८ रुपयांनी कमी होतील-गडकरी
3 अब की बार महंगाई की मार! आता अनुदानित सिलिंडरही महागले
Just Now!
X