News Flash

भारत आमचा संरक्षण क्षेत्रातील उद्योन्मुख भागीदार : अमेरिका

'इंडिया आयडियाज समिट'दरम्यान व्यक्त केलं मत

“भारत हा अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातील उद्योन्मुख भागीदार आहे,” असं वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी केलं. तसंच पुढील जी ७ परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिल्याचंही ते यावेळी म्हणाले. ‘इंडिया आयडियाज समिट’दरम्यान पॉम्पिओ बोलत होते.

यादरम्यान पॉम्पिओ यांनी भारतानं चीनच्या बॅन केलेल्या ५९ अॅप्सचाही उल्लेख केला. “चीनची ५९ अॅप्स बंद करण्याच्या भारताच्या निर्णयाचं मी समर्थन करतो. यामुळे भारतीयांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असता,” असंही ते म्हणाले. पॉम्पिओ यांच्या आधी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेदेखील या परिषदेत सहभागी झाले होते. “भारत आणि अमेरिकेनं व्यापाराच्या मुद्द्यावर काम करण्याव्यतिरिक्त काही मोठे विचार करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेला बहुपक्षीय प्रणालीसह काम करण्याची आवश्यक आहे. प्रतिभाभोवती दोन्ही देशांमध्ये एक संबंध आहे, जो आपल्या अर्थव्यवस्थेसाठी, तंत्रज्ञानासाठी आणि नाविन्याससाठी खूप महत्वाचा आहे,” असं जयशंकर यापू्र्वी म्हणाले.

“भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये जगाला दिशा देण्यासोबतच एकत्रित काम करण्याचीही क्षमता आहे. समुद्री सुरक्षा, दहशतवाद, कनेक्टिव्हिटी, करोना विषाणू, वातावरणातील बदल अशा विषयांवरही आम्ही एकत्रित काम करत आहोत. यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट होत आहेत,” असंही ते म्हणाले.

भारताचं मोठं सहकार्य – केनेथ जस्टर

“भारतानं जगभरातील १०० पेक्षा अधिक देशांना औषधं उपलब्ध करून दिली आहे. दोन्ही देशांमधील सहकार्य उत्तम आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यानंतर ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अनेकदा संभाषण झालं आहे. आम्ही खरोखरच एका सामरिक भागीदारीचे सर्वसमावेशक जागतिक रणनीतिक भागीदारीत रूपांतर केले आहे आणि पंतप्रधानांनी अलीकडेच म्हटल्याप्रमाणे हे दोन्ही देशांमधील २१ व्या शतकातील हे सर्वात महत्त्वपूर्ण संबंध असू शकतात,” असं मत अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनी व्यक्त केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 8:42 pm

Web Title: india america relations us secretary of state at india ideas summit foreign minister s jaishankar pm narendra modi jud 87
Next Stories
1 अशोक गेहलोत यांचं पंतप्रधान नरेंद मोदींना पत्र; म्हणाले,”त्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही”
2 “लडाखमधील भारताच्या एअर’फोर्स’चा चीननं घेतला धसका”
3 “आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नका”; सचिन पायलट समर्थकही सर्वोच्च न्यायालयात
Just Now!
X