28 September 2020

News Flash

भारत-चीन वाद : कमांडर पातळीवरील चर्चा निष्फळ; आज होणार मेजर जनरल पातळीवरील बैठक

यापूर्वीही चीनच्या आडमुठेपणामुळे चर्चेतून निघाला नव्हता मार्ग

संग्रहित छायाचित्र

गेल्या काही दिवसांपासून भारत चीन दरम्यान सुरू असलेला तणाव अद्यापही निवळलेला नाही. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान २० भारतीय जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतानंही प्रत्युत्तर देत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. त्यानंतर हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु चीनच्या आडमुठेपणामुळे तणाव कमी करण्यात यश आलेलं नाही. दरम्यान, चीन आणि भारताच्या लष्कराच्या कंमांडर स्तरावरील बैठकीतून कोणताही मार्ग निघाला नाही. त्यामुळे आता मेजर जनरल स्तरावरील बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

मेजर जनरल स्तरावरील बैठक ही दौलत बेग ओल्डी या ठिकाणी होणार असल्याची माहिती एएनआयनं लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. यापूर्वी पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेल्या तणावातून मार्ग निघण्याची शक्यता धुसर झाली होती. एकूणच या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत चीनला लागून असलेल्या सीमाभागांमध्ये आणखी ३५ हजार जवान तैनात करण्याची तयारी करण्यात आली होती.

भारताची ३,४८८ किलोमीटरची सीमारेषा चीनला लागून आहे. १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. त्यानंतर पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांनी आपले हजारो सैनिक, रणगाडे, तोफा, फायटर विमाने तैनात केली असल्याचीही माहिती समोर आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:09 pm

Web Title: india and china to hold major general level talks today at daulat beg oldi area to discuss disengagement by chinese side jud 87
Next Stories
1 रिया चौकशीदरम्यान सहकार्य करत नाही?; संतापलेल्या वकिलांनी दिलं ‘हे’ उत्तर
2 मशिदीच्या पायाभरणीच्या वक्तव्यावरून विरोधकांचा योगींवर निशाणा; म्हणाले…
3 २४ तासांत ६१,५६७ नवे करोनाबाधित, ९३३ जणांचा मृत्यू
Just Now!
X