अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन मंगळवारी आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर भारतात आले आहेत. या भेटीत अफगाणिस्तानातील परिस्थिती, इंडो-पॅसिफिकमधील संपर्कांना प्रोत्साहन देणे आणि करोना साथीच्या आव्हानांना सामोरे जाणे यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. अँटनी ब्लिंकेन यांनी दोन्ही देशांमधील संबंध आणि त्यांच्या लोकशाही मूल्यांबाबतच्या वचनबद्धतेचे कौतुक केले.

अँटनी ब्लिंकेन यांनी नेत्यांच्या आणि पराराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेटी घेण्यापूर्वी हे निवेदन दिले. ब्लिंकन यांनी ट्विट केले की, “आज नागरी समाजातील नेत्यांना भेटून आनंद झाला. भारत आणि अमेरिका लोकशाही मूल्ये प्रतिबद्ध आहेत, आमच्या संबंधांचा हा एक भाग आहे आणि भारताचा बहुलतावादी समाज आणि समरसतेचा इतिहास प्रतिबिंबित करतो. नागरिकांच्या संघटना या मूल्यांना पुढे आणण्यास मदत करतात.” असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ब्लिंकेन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांच्या अगोदर अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये हवामान बदलाविषयी अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी जॉन केरी यांनी भारताला भेट दिली होती.

ब्लिंकेन म्हणाले की, असे कोणतेही संकट नाही ज्याचा आपल्या नागरिकांच्या जीवनावर परिणाम होत नाही, मग तो सर्व जगशभर असलेला करोना असो किंवा उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा परिणाम असो, आपल्यापैकी कोणीही त्याला एकटे तोंड देऊ शकत नाही. देशांमधील सहकार्य पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे. ते म्हणाले की, राष्ट्रपती बिडेन यांचा निर्धार भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याचा आहे. करोनाचा अमेरिका आणि भारत दोघांवर फार वाईट परिणाम झाला. साथीच्या रोगाच्या सुरुवातीच्या वेळी भारताने दिलेल्या मदतीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

“जगात अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांपेक्षा काही महत्त्वाची नाती महत्त्वाची आहेत. आम्ही जगातील दोन प्रमुख लोकशाही असलेले देश आहोत आणि आमची विविधता त्याला प्रोस्ताहन देते. भारतात परत आल्याचा मला आनंद आहे. मी माझ्या कुटुंबासमवेत ४० वर्षांपूर्वी येथे आलो होतो. आम्ही जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहोत,” असे ब्लिंकेन यांनी म्हटले.