News Flash

‘या’ परदेशी नागरिकांना भारतात येण्यास बंदी, कारण…

नागरी उड्डयन महासंचालकांनी काढले फर्मान

जगभरात कोरोना व्हायरसनं भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. भारतातही काही राज्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत. चीनमधून सगळीकडे पसरत असलेला हा आजार भारतात आणखी पसरू नये, यासाठी आता खबरदारी घेण्यात येत आहे. जे परदेशी नागरिक १५ जानेवारीनंतर चीनमध्ये जाऊन आले, अशा नागरिकांना सध्या देशात येऊ द्यायचं नाही, असं फर्मान भारतात काढण्यात आलंय.

चीनमधून हवाई, रस्ते किंवा समुद्री मार्गानं येण्याचे परदेशी किंवा चिनी नागरिकांचे सगळेच दारं सध्या बंद करण्यात आली आहेत. नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार अशा चारही देशांतून रस्त्याच्या मार्गानं येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

चीनचा पासपोर्ट असणाऱ्या सगळ्यांचा भारतीय व्हिसा सध्या रद्द करण्यात आला आहे. त्यामुळं त्यांना कोणत्याच मार्गानं भारतात येता येणार नाही. ५ फेब्रुवारी २०२० पूर्वी काढलेला ई-व्हिसा असो वा नियमित व्हिसा असो कोणत्याही चिनी नागरिकाला सध्या भारतात प्रवेश मिळणार नाही, असे आदेश नागरी उड्डयन महासंचालकांनी काढले आहेत.

जगात कोठेही राहणारे चीनचे नागरिक किंवा चीनमध्ये राहणारे परदेशी नागरिक आणि १५ जानेवारीनंतर चीनमध्ये जाऊन आलेले परदेशी पर्यटक यांना भारतात प्रवेश दिला जाणार नसल्याचे या आदेशात म्हटलं आहे.

इमर्जन्सी असेल तर काय करणार?
भारतात येणे अत्यावश्यकच असेल तर त्यांना बिजिंगमधील भारतीय दुतावासाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. ते शक्य नसल्यास शांघाय आणि गुआंगझू येथे नव्या व्हिसासाठी अर्ज करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या बंदीतून कोणाला आहे सूट?
विमान कर्मचाऱ्यांना ही भारतात येण्याची बंदी लागू नसेल. मग, ते चिनी नागरिक असो वा इतर कोणत्याही देशाचे नागरिक असो, त्यांना चीनमधून भारतात येता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2020 12:29 pm

Web Title: india bars entry for foreigners china coronavirus pkd 81
टॅग : China,India China
Next Stories
1 थायलंडमध्ये सैनिकाच्या बेछूट गोळीबारात १७ ठार
2 पुन्हा केजरीवाल करिष्मा
3 ‘करोना’ग्रस्त देशांना अमेरिकेची मदत
Just Now!
X