भारतीय वंशाचे पत्रकार अमोल रंजन यांची ब्रिटनमधील द इंडिपेंडंट या वृत्तपत्राच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका राष्ट्रीय वृत्तपत्राच्या संपादकाचा मान पहिल्यांदाच श्वेतवर्णेतर व्यक्तीला मिळाला आहे.
अमोल रंजन यांचा जन्म कोलकाता येथे झाला, तीन वर्षांचे असताना ते लंडनला गेले व दक्षिण लंडनमध्ये टूटिंग भागात राहात होते. नंतर ते केंब्रिज विद्यापीठात इंग्रजी शिकले. तरुण वयात त्यांनी इव्हिनिंग स्टँडर्ड व चॅनेल फाइव्ह या प्रसारमाध्यमांसाठी काम केले. नंतर ते द इंडिपेंडंट मध्ये आले.
द इंडिपेंडंटचे मालक एव्हिग्नी लेबेदेव यांनी ट्विटरवर सोमवारी सकाळी रंजन यांच्या नियुक्तीसंबंधी घोषणा केली.