भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला विकासाचे वचन दिले होते. त्यावर लोकांनी त्यांनी मतेदेखील दिली. मात्र, आता परिस्थिती वेगळीचं असून, देशात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर  असेच राहिले तर भारत वाचू शकणार नाही, असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी म्हटले आहे.
जम्मूचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी देशात सामाजिक-धार्मिक सलोखा टिकून राहण्यासाठी मांडलेला प्रस्ताव विधानसभेच एकमताने संमत करण्यात आला. याबद्दल मुफ्ती यांनी सर्व आमदारांचे आभार मानले. तसेच, काश्मीर जनतेने भावनेच्या आहारी न जाता सहिष्णुतेचे दर्शन घडवले याबद्दल त्यांची प्रशंसाही केली. मुफ्ती म्हणाले की, समाजात द्वेष आणि कट्टरतेला थारा नाही. महान नेत्यांनी आपल्याला सर्वांना सामावून घेण्याची शिकवण दिलेली आहे. पण, अशांतता पसरवून अल्पसंख्यांकांमध्ये काहीजण असुरक्षततेची भावना निर्माण करतायतं. अशावेळी तुम्ही धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता आणि एकतेच्या मार्गाने चालण्याचा संदेश यावेळी दिला.