News Flash

सर्व आव्हानांचा सामना करण्यास भारत सक्षम – मोदी

एक देश आणि एकदिलाने आम्ही गेल्या वर्षी आव्हानांचा मुकाबला केला.

सर्व आव्हानांचा सामना करण्यास भारत सक्षम – मोदी
(संग्रहित छायाचित्र)

करोनाशी लढा असू द्या अथवा सीमेवरील संघर्षांची स्थिती असू द्या, आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचलण्यासाठी सक्षम असल्याचे भारताने गेल्या वर्षी दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.

एक देश आणि एकदिलाने आम्ही गेल्या वर्षी आव्हानांचा मुकाबला केला. करोनाच्या फैलावामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम आपल्याला दूर करावयाचे आहेत, असेही मोदी म्हणाले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. गेल्या वर्षी भारताने आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी अनेक पावले उचलण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले. करोनावरील संरक्षण लस असू द्या की भारताला आव्हान देणाऱ्या शक्तींचा क्षेपणास्त्रांनी केलेला विनाश असू द्या, भारत सर्व आघाडय़ांवर सक्षम आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारत लशीच्या क्षेत्रात जर आत्मनिर्भर आहे तर तो तितक्याच जोमाने सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारताची सशस्त्र दले सर्वार्थाने सक्षम होण्यासाठी सर्व पावले उचलण्यात आली आहेत, आता देशाकडे उत्तम युद्धयंत्रणा आहे. भारत हा लवकरच संरक्षणविषयक सामग्रीच्या उत्पादन करणारा मोठा देश म्हणून प्रसिद्ध होईल, असेही मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 12:33 am

Web Title: india capable of meeting all challenges abn 97
Next Stories
1 अधिवेशनावर आंदोलनाचे सावट
2 भारत-चीन तणाव दूर करण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांची रूपरेषा
3 काँग्रेस आणि डाव्या पक्षांमध्ये १९३ जागांबाबत मतैक्य
Just Now!
X