News Flash

चांद्रयान 22 जुलैला अवकाशात झेपावणार

यापूर्वी तांत्रिक कारणांमुळे चांद्रयानाचे उड्डाण रद्द करण्यात आले होते.

चांद्रयान 22 जुलैला अवकाशात झेपावणार
संग्रहित छायाचित्र

तांत्रिक बिघाडामुळे इस्त्रोला चांद्रयान-2 चे उड्डाण रद्द करावे लागले होते. आता हे यान येत्या 22 जुलै रोजी अवकाशात झेपावणार आहे. 15 जुलैला सोमवारी मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 अवकाशात झेपावणार होते. पण क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम गॅस बॉटलच्या जॉईंटमधून गळती झाली. त्यामुळे 56 मिनिटे आधीच उड्डाण रद्द करण्यात आले.

दरम्यान, 22 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 53 मिनिटांनी चांद्रयान-2 अवकाशात झेपावणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. अखेरच्या क्षणी तांत्रिक बिघाड उदभवल्यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोला महत्वकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेचे उड्डाण रद्द करावे लागले होते. GSLV MK 3 प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये ही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने याचे उड्डाण रद्द करण्यात आले होते.

चांद्रयान-2 हा 987 कोटींचा प्रकल्प असून अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर रोव्हर उतरवणारा भारत चौथा देश असेल. सोमवारी रात्री हे प्रक्षेपण पाहण्यासाठी देशभरातून सात हजार नागरीक श्रीहरीकोट्टा येथे गेले होते. मिशन कंट्रोल सेंटरमध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वत: त्यावेळी उपस्थित होते. आता येत्या सोमवारी चांद्रयान अवकाशात झेपावणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 11:29 am

Web Title: india chandrayaan 2 isro sriharikota 22 july afternoon jud 87
Next Stories
1 २ ऑगस्टपासून राममंदिर प्रकरणी दररोज सुनावणी-सुप्रीम कोर्ट
2 कुलभूषण जाधव यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करणार – इम्रान खान
3 कुलभूषण यांना दोषी ठरवण्यासाठी पाकिस्तानने खर्च केले २० कोटी, भारताने एका रुपयात खटला जिंकला
Just Now!
X