24 November 2020

News Flash

लष्कराच्या ‘या’ रेजिमेंटनं उधळून लावला चीनच्या घुसखोरीचा डाव

भारत-चीन सीमावाद

फोटो सौजन्य - ANI

गलवान व्हॅलीनंतर पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात चिनी सैन्यानं २९-३० ऑगस्टच्या रात्री घुसखोरीचा प्रयत्न केला. पण, सर्तक असलेल्या भारतीय जवानांनी चिनी सैन्याचा डाव उधळून लावला. भारतीय लष्कराच्या विकास रेजिमेंट बटालियनच्या जवानांच्या कर्तबगारीमुळे चीनला अद्दल घडली.

‘आजतक’नं सूत्रांच्या हवाल्यानं सीमेवर घडलेल्या घटनेबद्दल वृत्त दिलं आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच चीननं पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर कुरापती केल्या. चिनी सैन्यानं घुसखोरी करून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चिनी सैन्याचा हा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडला.

उत्तराखंडमधून विकास रेजिमेंटच्या बटालियनच्या जवानांना पँगाँग सरोवर परिसरात तैनात करण्यात आलं होतं. याच बटालियननं लाईन ऑफ कंट्रोल अर्थात LAC वरील ज्या भागावर चीनची नजर आहे. तिथे ताबा घेतला. हा भाग भारतीय हद्दीत येतो. मात्र, चीन यावर दावा करत आहेत.

घुसखोरी करून या भागावर ताबा मिळवण्याचा चिनी सैन्याचा प्रयत्न होता. ज्यामुळे पँगाँग परिसरातून साऊथ बँक परिसरात भारतीय सैन्याविरोधात फायदा उठवता येईल. मात्र, याठिकाणी अगोदर कर्तव्यावर असलेल्या भारतीय जवानांनी चीनची योजना उधळून लावली.

दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरु असतानाच आज (१ सप्टेंबर) दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये (शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करता येईल एवढ्या अंतरावर) आले. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहनं कालाटोप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत. हा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. चीनकडून जड आणि तसंच हलक्या वजनाचे रणगाडे तैनात करण्यात आले असून भारतापासून जवळच्या अंतरावर आहेत. दुसरीकडे कालाटोप येथे तैनात असणारे भारतीय जवानही रणगाडे आणि तोफांसोबत पूर्णपणे सुसज्ज आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 7:18 pm

Web Title: india china border clash inside story vikas regiment battalion of indian army ladakh bmh 90
Next Stories
1 तरूणांना भाषण नाही, नोकरी पाहिजे – प्रियंका गांधी
2 सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा; हत्या झाल्याचे पुरावे नाहीत
3 लडाखमधील जवळपास १ हजार चौरस किलोमीटर जागेवर चीनचं नियंत्रण
Just Now!
X