20 September 2020

News Flash

सीमेवर तणाव कमी करण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमावर एकमत; सैनिक हटवण्यावरही चर्चा

तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात होती.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन दरम्यान सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. भारताकडून तणाव कमी करण्यासाठी सततच चर्चेचं आवाहन होत असलं तरी चीनच्या कुरापती मात्र सुरूच होत्या. अशा परिस्थितीत भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये मॉस्कोत एक चर्चा पार पडली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत तब्बल दोन तास चर्चा केली. यावेळी सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये ५ कलमी कार्यक्रमावर एकमत झालं. तसंच दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू राहणार असून सैनिकांची संख्या कमी करण्याच्या प्रक्रियेतही गती आणण्यावर या बैठकीत चर्चा झाली.

सीमेवर सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी आणि सीमेवरी सैनिकांना हटवण्यासंदर्भात एस.जयशंकर आणि वांग यी यांच्यादरम्यान गुरूवारी बैठक पार पडली. दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मॉस्कोमध्ये दाखल झाले आहेत. भारत आणि चीन या दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध विकसित करण्यासाठी नेत्यांच्या सहमतीवरून मार्गदर्शन घ्याव आणि दोन्ही देशांतील मतभेदांचं रूपांतर वादात होऊ नये, असंही या बैठकीत ठरवण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्रालयतर्फे सांगण्यात आलं.

दरम्यान, भारत-चीन सीमेसोबकत दोन्ही देशांच्या संबंधांवर झालेल्या परिणामांची स्पष्टपणे चर्चा करण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्रालयाद्वारे सांगण्यात आलं. दोन्ही देशांमध्ये संवाद कायम राहिला पाहिजे, सैनिकांना सीमेवरून हटवण्याच्या प्रक्रियेत गती आली पाहिजे, तणाव कमी झाला पाहिजे अशा गोष्टींवर एकमत झाल्याचंही दोन्ही देशांकडून सांगण्यात आलं. “दोन्ही देशांमध्ये असलेले संबंध योग्य दिशेने पुढे नेले जातील. अशा कोणत्याही समस्या आणि आव्हानं नाहीत ती दूर केली जाऊ शकत नाही,” असं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

“दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात तणाव वाढू नये. तसंच चीनबाबत भारतानं कोणत्याही धोरणात बदल केला नाही,” असंही जयशंकर यांनी बैठकीदरम्यान सांगितलं. सीमेवरील लष्कर लवकरत लवकर हटवण्यात यावं आणि चीन काही मुद्द्यांचा तोडगा काढण्यासाठी चर्चेसाठी तयार असल्याचंही चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 7:45 am

Web Title: india china border tension foreign minister s jayshankar met china wang yi meeting russia moscow jud 87
Next Stories
1 भारताकडे वाकडय़ा नजरेने पाहणाऱ्यांसाठी ‘राफेल’ हा संदेश – राजनाथ सिंह
2 संसदेच्या अधिवेशनाचे डिजिटल कामकाज
3 भारत-जपान दरम्यान संरक्षणविषयक सहकार्य करार
Just Now!
X